Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

कोंढवा भिंत दुर्घटना : मृतांना प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर

Share

पुणे | प्रतिनिधी

कोंढवा परिसरात भिंत कोसळून १७ कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पहाटे दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली.  अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून मदतकार्य सुरू आहे.

मृतांमध्ये महिला आणि दोन मुलांचाही समावेश आहे. दरम्यान, या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना चार लाखांची मदत करण्यात येणार आहे.

कोंढवा या ठिकाणी मोठ्या बांधकामांसाठी पोकलेन मशीनच्या मदतीने खोदकाम सुरू आहे. त्याला लागून असलेल्या बांधकामावर काम करणाऱ्या झोपड्या होत्या.

रात्रभर झालेल्या पावसामुळे आणि शेजारी सुरू असलेल्या खोदकामामुळे आल्कन स्टायलस या सोसायटीची भिंत कोसळली. मजुरांच्या तात्पुरत्या झोपड्या जमीनदोस्त झाल्या.

हे सर्व मजूर बिहार आणि पश्चिम बंगालचे आहेत. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना एनडीआरएफच्या निधीतून चार लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!