Type to search

हिट-चाट

कोण होणार करोडपतीसाठी नागराज घेतात इतकं मानधन

Share

मुंबई – नागराज मंजुळे कोण होणार करोडपती या लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोचे सूत्रसंचालन करत आहेत. नागराज मंजुळेंचा हा नवा अंदाज प्रेक्षकांनाही पसंत पडत आहे. शिवाय या कार्यक्रमासाठी त्यांना चांगलं मानधनही मिळत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार नागराज यांना या सिझनसाठी दोन कोटी रुपये मिळत आहेत. या सिझनमध्ये एकूण 45 एपिसोड असणार आहेत. मात्र या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. याआधी कोण होणार करोडपतीच्या पर्वांचे सूत्रसंचालन स्वप्नील जोशी आणि सचिन खेडेकर यांनी केलं होतं.

मात्र यंदा एका नव्या चेहर्‍याला संधी देण्यासाठी वाहिनीने नागराज मंजुळेंची निवड केली आहे. हिंदीच्या तुलनेत मराठी कार्यक्रमांचं बजेट कमी असल्याने कोण होणार करोडपतीच्या विजेत्याला मिळणारी रक्कमसुद्धा कमी आहे. अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या कोण बनेगा करोडपतीच्या विजेत्याला 7 कोटींची रक्कम मिळते तर मराठीत ही रक्कम 1 कोटी रुपये इतकीच आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात मुख्य भूमिकेत बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन दिसणार आहे. अमिताभ यांचा हा चित्रपट फुटबॉल कोच विजय बरसे यांच्या जीवनावर आधारित आहे. झुंड हा चित्रपट भूषण कुमार, कृष्ण कुमार, सविता राज, राज हिरेमथ आणि नागराज मंजुळे असे सगळे मिळून प्रोड्यूस करत आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!