Type to search

Breaking News Featured मुख्य बातम्या सार्वमत

कोळपेवाडी दरोडा : पपड्याचा भाऊ गजाआड

Share

आणखी एका महिलेस पकडले; आरोपींची संख्या 21

कोपरगाव (प्रतिनिधी)- तालुक्यातील कोळपेवाडी येथील लक्ष्मी ज्वेलर्सवर दरोडा टाकून सराफाची हत्या प्रकरणातील आणखी दोन आरोपींच्या नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने औरंगाबाद येथे जाऊन मुसक्या आवळल्या. श्रीमंत ईश्वर काळे (राय मिटमिटा, औरंगाबाद) व प्रिया जितू भोसले (रा. जोगेश्वरी, वाळुंज एमआयडीसी, औरंगाबाद) अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, कोळपेवाडी येथील लक्ष्मी ज्वेलर्सवर दि. 8 ऑगस्ट 2018 रोजी दरोडा टाकण्यात आला होता. दरोड्यात दरोडेखोरांनी गोळीबार करून सराफ श्याम धाडगे यांची हत्या केली. तसेच सोन्याचे व चांदीचे दागिने लुटून नेले होते. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. नगर स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.दिलीप पवार व त्याच्या पथकातील पोलीस कर्मचार्‍यांनी या घटनेचा तपास करीत, पपड्या उर्फ गणपती काळे (वय 55 रा. सुदर्शननगर, वर्धा) यांच्यासह टोळीतील 16 आरोपी व चोरीचे सोने घेणारे तीन सरफांना असे एकूण 19 आरोपींना यापूर्वीच अटक केली आहे.

यापैकी फरार आरोपींचा शोध सुरु असतानाच फरार आरोपी श्रीमंत्या काळे व प्रिया भोसले हे मिटमिटा (जि.औरंगाबाद) येथे येणार असल्याची माहिती मिळाली. सदर ठिकाणी नगर व औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकार्‍यांनी जाऊन सापळा लावला. सापळ्यात दोन्ही आरोपी अलगद आडकले. दोन्ही आरोपींना कोपरगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आरोपी श्रीमंत ईश्वर काळे हा पपड्या काळे याचा चुलत भाऊ असून, तो टोळीतील प्रमुख साथीदार आहे. श्रीमंत काळे याचेवर चंद्रपूर शहर, कोतवाली छिंदवाडा शहर, मध्यप्रदेश, सोमपेठा तेलंगणा, नगर तालुका, पुलगांव वर्धा, लाडखेड यवतमाळ, मानवत परभणी, नागबीड नागापूर ग्रामीण, डुगीपर गोंदीया, तासगाव सांगली, हिंगोली तालुका, अंबड जालना आदीं पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हो दाखल आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पोसई रोहन खंडगळे, सा. फौ. सोन्याबापू नानेकर, पो.ना. मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, रवींद्र कर्डिले, भागीनाथ पंचमूख, योगेश सातपुते, म.पो.कॉ.सोनाली साठे, चालक पो.हे.कॉ. बबन बेरड आदींसह औरंगाबाद शहर स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.मधुकर सावंत, पोसई अमोल देशमुख, पोसई योगेश धांडे, विजय पवार आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!