कोलकाता : फोटो काढण्यासाठी गाडीतून उतरलेल्या व्यक्तीला हत्तीने चिरडले

0

जंगलात सफारी करताना गाडीतून उतरणे धोकादायक असते, त्यामुळेच पर्यटकांना गाडीतून न उतरण्याच्या सूचना दिल्या जातात.

मात्र, अनेकदा पर्यटक सुचनांकडे दुर्लक्ष करत प्राण्यांना जवळून पाहण्यासाठी गाडीतून उतरत जीव धोक्यात घालताना दिसतात.

उत्तर बंगालमध्ये हत्तीचा फोटो काढण्यासाठी गाडीतून उतरलेल्या व्यक्तीला हत्तीने चिरडून ठार केल्याची घटना समोर आली आहे.

जलपैगु़डी जिल्ह्यातील लतागौरी जंगल परिसरात ही घटना घडली आहे. गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता ही घटना घडली.

ष्ट्रीय महामार्ग 31 वर घडलेल्या या घटनेमुळे काळी काळासाठी वाहतूक ठप्प झाली होती.

LEAVE A REPLY

*