कोलकत्ताच्या बगरी मार्केटमध्ये आगीचे रौद्र रूप; मदतकार्य चालू

0

कोलकाता : पश्चिम बंगाल मधील सेंट्रल कोलकाताच्या बगरी मार्केटमध्ये एका इमारतीला भीषण आग लागली आहे. सदर ठिकाणी घटनास्थळावर अग्निशमन दलाच्या ३० गाड्या पाचारण करण्यात आल्या आहेत. या आगीला ९ तास झालेअसूनही अद्याप आग आटोक्यात आणण्यात अग्निशामकास यश आले नाही. या ठिकाणी लोकांचं वास्तव्य असल्याने तातडीने मदतकार्य चालू झाले आहे.

ही आग शनिवारी मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. आग लागलेल्या इमारतीच्या आजू-बाजूला उंच इमारती असल्यामुळे बचाव कार्यात अडचण होत आहे.

आग लागलेले हे दुकान सौंदर्य प्रसाधन आणि औषधांचे आहे. त्यामुळे प्लास्टीकच्या वस्तूंना आगीने भक्ष्य केले आहे. म्हणून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वेळ लागत आहे. सध्या ही आग वाढत जाऊन ५व्या मजल्यापर्यंत पोहोचली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*