कोलकत्ता : देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो लवकरच धावणार
Share

कोलकत्ता : देशातील पहिली मेट्रो १९८४ मध्ये धावल्यानंतर आता लवकरच कोलकाता येथे पाण्याखाली ट्रेन आहे. कोलकात्यातील हुगळी नदीखालून ही ट्रेन धावणार असून देशातील पहिला प्रोजेक्ट असल्याने सर्वानाच उत्सुकता आहे.
दरम्यान या रेल्वे लाईनचे काम पूर्णत्वास आले असून हा प्रकल्प पूर्ण होणार असल्याने हे गौरवास्पद बाब असल्याचे प्रतिपादन रेल्वेमंत्री रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली आहे.
या रेल्वेचे वैशिष्टये असे कि, ही ट्रेन सॉल्टलेक सेक्टर ५ ते हावडा मैदानापर्यंत धावण्यास जवळपास तयार आहे. त्यामुळे रेल्वेमार्ग दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. यातील पहिला टप्पा लवकरच प्रवाशांसाठी खुला केला जाणार आहे. या ट्रेनला पाण्यापासून वाचवण्यासाठी उच्चस्तरीय सुरक्षा कवच लावले आहे.
नदीमधून जाणारा हा मार्ग ५२० मीटर लांब व ३० मीटर खोल आहे. ट्रेनला हे अंतर पार करण्यासाठी ६० सेकंदाचा वेळ लागणार आहे.