Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

ऐतिहासिक गुलाबी कसोटीत भारताचा विजय; मालिकेत क्लीन-स्वीप

Share

कोलकत्ता : डे नाईट कसोटीमध्ये भेटणे विजय मिळवत मालिकेवरही शिक्कामोर्तब केले आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथे बांग्लादेश विरुद्ध टीम इंडियाने दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक डाव आणि ४६ धावांनी विजय मिळवला आहे.

दरम्यान कोलकत्ता येथे गुलाबाई कसोटी आयोजित केली होती. यामध्ये दोन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने बांग्लादेशचा २-० ने क्लीन-स्वीप केला आहे. भारतीय संघाने यापूर्वी इंदोरमध्ये झालेल्या सामन्यात डाव आणि १३० धावांनी विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावांत फलंदाजी करताना बांग्लादेशला १९५ धावाच करता आल्या. बांग्लादेशकडून मुशफिकुर रहीम याने ९६ चेंडूत सर्वाधिक ७४ धावा केल्या. भारताने पहिला डाव ९ बाद ३४७ धावांवर घोषित करत बांग्लादेशवर २४१ धावांची आघाडी घेतली होती. याच्या प्रत्युत्तरात बांग्लादेशने दुसर्‍या दिवसाचा खेळ संपेपर्यंत दुसर्‍या डावात १५२ धावांवर ६ विकेट गमावले होते.

अशा परिस्थितीत बांग्लादेशवर पुन्हा एकदा डावाने पराभव होण्याचे संकट होते, पण रहीमने दुसऱ्या दिवशी महमुदुल्लाह याच्या साथीने संघाचा डाव सावरला आणि भारताच्या विजयाची प्रतीक्षा वाढवली.
टीम इंडियाकडून इशांत शर्मा याने प्रभावी कामगिरी केली. पहिल्या डावात 5 घेणाऱ्या इशांत शर्मा (Ishant Sharma) याने दुसऱ्या डावात 4 आणि उमेश यादव (Umesh Yadav) याने 5 गडी बाद करत भारताचा विजय निश्चित केला. मोहम्मद मिथून, मुश्फिकुर रहीम, तैजुल इस्लाम, एबादत हुसेन आणि अल अमीन हुसेन यान फलंदाजांना उमेशने दुसऱ्या डावात बाद केले. दुसऱ्या डावांत फलंदाजीसाठी आलेल्या बांग्लादेशने एका वेळी 13 धावांवर चार विकेट गमावले होते, परंतु अर्धशतक झळकावत रहीमनेतिसर्‍या दिवसापर्यंत सामना खेचला.महमुदुल्लाहही चांगली फलंदाजी करत होता, पण त्याला दुखापतीमुळे रिटायर्ड हर्ट परतावे लागले. महमुदुल्लाहने 39 धावा केल्या होत्या, जेव्हा त्याला दुखापत झाली.

यापूर्वी, टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने १३६ धावांची डाव खेळला. दुसर्‍या दिवशी पहिल्या सत्रात कोहलीने शतक पूर्ण केले आणि डे-नाईट कसोटी सामन्यात शतक ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. विराटऐवजी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी संघात अर्धशतकांचे योगदान दिले. पुजाराने ५५ आणि रहाणेने ५१ धावा केल्या.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!