Type to search

Featured सार्वमत

कोल्हारमध्ये घरावर दगड मारण्याचा संशयावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी

Share

परस्परविरोधी फिर्यादी दाखल; 29 जणांचा समावेश; चार जणांना अटक

कोल्हार (वार्ताहर) – घरावर दगड मारण्याच्या संशयावरून कोल्हार भगवतीपूर येथील अंबिकानगर वसाहतीत दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. स्टीलचा रॉड, लाकडी दांडक्याांच्या साह्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. घटनेसंदर्भात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून 4 जणांना अटक करण्यात आलेली आहे. उर्वरीत पसार असून त्यांचा शोध सुरू आहे.

कोल्हार भगवतीपूर येथील अंबिकानगरमध्ये वास्तव्यास असलेल्या विनोद साहेबराव जाधव (वय 24) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, वसीम शेख, शाहरुख खान, गब्बार खान, राजू खान, शाहरुख शेख, नजीम सय्यद, अकबर शेख, परवेज शेख, सलमान खान, जाकीर सय्यद, अश्पाक सय्यद, महेबूब शेख, नाना शेख, मलीम शेख सर्व रा. अंबिकानगर, कोल्हार यांनी फिर्यादी जाधव यांना घरावर दगड मारीत असल्याच्या संशयावरून विचारणा केली. यातून शिवीगाळ झाली. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. लोखंडी रॉड, लाकडी दांडक्यांच्या साह्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. विनोद जाधव याच्या डोक्यात दुखापत झाल्याची फिर्याद देण्यात आली आहे. यासंदर्भात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 188/2019 भारतीय दंडविधान कलम 324, 323, 143, 147, 148, 149 अन्वये वरील 14 जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.

तसेच अंबिकानगरमध्येच वास्तव्यास असलेल्या वसीम सिकंदर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, आमच्या घरावर दगड का मारतो? अशी विचारणा करण्यासाठी गेले असता दत्तू जाधव यांनी वसीम शेख यास शिवीगाळ करून गालावर चापट मारली. त्याने व त्यासोबत असलेल्या कांचन जाधव, दत्तू जाधव, सुभाष गायकवाड, मनोज गायकवाड, विनोद जाधव, पवन जाधव, पवन निकम, विकी गायकवाड, शुभम गायकवाड, सोमा गायकवाड, किशोर गायकवाड, अहिल्या गायकवाड, मंगेश गायकवाड, चेतन गायकवाड, नितीन गायकवाड सर्व रा. अंबिकानगर, कोल्हार यांनी स्टीलचा रॉड व लाकडी दांड्याच्या साह्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यात डावा हात व उजव्या पायाला फॅक्चर केल्याची फिर्याद देण्यात आली आहे. यासंदर्भात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 189/2019 भारतीय दंडविधान कलम 326, 323, 143, 147, 148, 149, 504 अन्वये वरील 15 जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक नाना सूर्यवंशी हे करीत आहेत.

या तुंबळ हाणामारीच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शाहरुख चांद उर्फ राजू खान, नूरमहम्मद सलीम शेख, महेबूब इब्राहीम पठाण, आमीन उर्फ नाना इब्राहीम पठाण या चौघांना अटक करण्यात आली. त्यांना काल सोमवारी राहाता न्यायालयात हजर करण्यात आले. उर्वरित आरोपी पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!