Type to search

Featured सार्वमत

कोल्हारमध्ये अग्नितांडव, सॉ मिल खाक, लाखोंचे नुकसान

Share

शेजारची घरे बचावली, जिवीतहानी नाही

कोल्हार (वार्ताहर)- कोल्हार येथील लोणी-कोल्हार रोडवरील डॉ. आंबेडकर महाविद्यालयासमोर असणार्‍या बाबुलाल देवजी पोकार यांच्या लाकडाच्या वखारीला आग लागली. यात वखारीतील लाकडांचा जळून कोळसा झाला. तर पत्र्याचे शेड आणि मशिनरीचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिवितहानी मात्र झाली नाही. ही घटना काल रविवारी रात्री घडली. रात्री 9 वाजण्याच्या सुमारास लागलेली आग रात्री 11 वाजेपर्यंत विझविण्याचे प्रयत्न सुरू होते.

या वखारीचे मालक रात्री 8 वाजता वखारीतील सर्व कामकाज आटोपून काही अंतरावरील एकनाथनगर येथील आपल्या घरी गेले होते. रात्री 9 वाजता त्यांच्या वखारीला आग लागल्याचे वखारी जवळील रहिवाश्यांनी त्यांना कळविले.
या लाकडाच्या वखारीला रात्री 9 वाजता भीषण आग लागली असून त्यात संपूर्ण वखार जळून खाक झाली आहे. वखारीतील लाकडे एकावर एक रचून ठेवलेली असल्याने वरून पाणी मारून आग विझवली तरी काही वेळाने खालच्या लाकडांमध्ये आग धुमसत असल्याने ती पुन्हा पेट घेत होती. त्यात वारा असल्याने आग आणखीच पसरत होती. त्यामुळे परिसरात धुराचे प्रचंड लोळ होते. तर दुसरीकडे आगीच्या ज्वाला भडकत होत्या.

या घटनेची माहिती कळताच जो तो घटनास्थळाकडे धाव घेत होता. त्यामुळे येथे प्रचंड गर्दी झाली होती. जो तो आपल्या परीने आग आणखी भडकणार नाही यासाठी प्रयत्न करीत होता. पण आग आटोक्यात येतच नव्हती. आगीची माहिती कळताच डॉ. विखे कारखाना तसेच देवळाली, राहाता, राहुरी आणि श्रीरामपूर पालिकेचे अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात यश आले.
या आगीत वखारीतील सर्व लाकडे जळून गेली आहेत. पत्र्याचे शेडचे प्रचंड नुकसान झाले आहे. लाकडे कापण्याच्या मशीनची अवस्था तर अत्यंत दयनीय झाली आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे मालक पोकार यांनी सांगितले.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!