कोल्हारमध्ये बिबट्या घरात घुसला!

0
कोल्हार (वार्ताहर) –  श्रीरामपूरातील भोकर, संगमनेरातील आश्‍वी खर्दमध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरू असतानाच, राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील एका घरात या बिबट्याने थेट मुक्काम ठोकला आहे.
विशेष म्हणजे वीज नसल्याने हा बिबट्या येेथे चालत चालत आला. त्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती. ही घटना काल गुरूवारी रात्री 8 वाजता घडली.
सर्वत्र भारनियामनाचा फटका बसत आहे. अशात राहुरी तालुक्यातील राहुरी खर्द येथेही अंधाराचे सम्राज्य होते. याचा फायदा बिबट्याने घेत तो चालत चालत हनुमान मंदिराजवळील दाट वस्ती असलेल्या पुजारी गल्लीत आला. अंधार असल्याने ही बाब  कुणाच्या लक्षात आली नाही.
तो ऐटीत येत असतानाच लाईट आली. अचानक लाईट आल्याने प्रकाशाने हा बिबट्या घाबरला. त्यातच त्याने जवळच असलेल्या एका छोट्याशा मातीच्या घरात घुसला. या घरात परिघाबाई नारायण खर्डे नामक वृध्दा झोपलेली होती. तिला ओलांडून या बिबट्याने आत प्रवेश केला.
या प्रकाराने ही वृध्दा घाबरली नी बाहेर आली. तिच्या ओरडण्याने शेजारीच असलेल्या कैलास माळी यांनी या वृध्देला काही अंतरावर सोडून या घराला बाहेरून कडी लावून घेतली. ही वार्ता हा हा म्हणता गावात पसरली.

जो तो मिळेल त्या वाहनाने घटनास्थळी बिबट्या पाहण्यासाठी आला. त्यामुळे प्रचंड गर्दी झाली. या जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी राहुरी पोलिसही दाखल झाले.

दरम्यान, येथील अन्सार शेख यांनी पोलिस पाटलास कळविले. त्यांनी राहुरी वनविभागाशी संपर्क साधला. वाघ, लांबे, पठाण, गायकवाड आणि लोढे हे 8.30 वाजता घटनास्थळी दाखलही झाले. रामपूर येथे असलेला पिंजरा आणण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यानच्या काळात तीन-चार उत्साही तरूण या घराची कडी उघडून आत गेले नी काही क्षणातच बिबट्या बिबट्या ओरडत बाहेर आले आणि बाहेरून पुन्हा कडी लावून घेतली.

LEAVE A REPLY

*