Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

राज्यातील मुस्लिम बांधव ‘बकरी ईद’चा खर्च पूरग्रस्तांसाठी देणार

Share

कोल्हापूर : राज्यातील कोल्हापूर सांगली या शहरांवर महापुराचे संकट कोसळले असून यामध्ये अनेक संसार उद्धवस्त होण्याबरोबरच अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशा भीषण परिस्थितीत राज्यातील अनेक मुस्लिम बांधवानी माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

दरम्यान देशभर सर्वत्र बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, राज्यातील अनेक मुस्लीम बांधवांनी ईदवर होणारा खर्च पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यात पुराने थैमान घातले असून यामध्ये अनेकांची घरे अक्षरशः पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेली आहेत. राज्यातील मुस्लीम बांधव बकरी ईद उत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करणार असून ईदवरील होणारा खर्च जिल्ह्यातील पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय बांधवांनी घेतला आहे.

दरम्यान, पूर ओसरायला सुरुवात झाली असली तरी अजूनही सांगली जिल्ह्यात बचावकार्य सुरु आहे. पुणे, मुंबई राज्यातील अनेक शहरांमधून मदचीचा ओघ पूरग्रस्त भागात वाढत आहे. शासनही वैद्यकीय सुविधेसह इतर जीवनावश्यक गोष्टी पुरवत आहे त्यात मुस्लीम समाजाकडून घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद ठरत आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!