Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

पुरग्रस्तांसाठी जाहीर झालेल्या शासकीय मदतीवर ‘स्टिकरबाजी’

Share

मुंबई : कोल्हापूर अन् सांगलीतील पूरस्थितीने संपूर्ण महाराष्ट्रतील जनता हळहळली आहे. या पुरग्रस्तांसाठी शासनाकडून मदत जाहीर केली आहे. मात्र यात १० किलो गहु व १० किलो तांदूळ पुरग्रस्त कुटुंबांना देण्यासाठी तयार केलेल्या पाकिटांवर मात्र विविध पदाधिकारी अधिकारी यांचे स्टिकर लावण्यात आल्याने सोचल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान कोल्हापूरकर आणि सांगलीकरांच्या घरात शिरलेले पाणी आणि महिला व बालकांचे हाल पाहून राज्यातील विविध भागातील जनतेच्या डोळ्यात अश्रु आले आहे. परंतु यावरच न थांबता सर्व जनतेनी माणुसकीचे दर्शन घडवत विविध प्रकारची मदत पाठविण्यासाठी हात पुढे केले आहे.

सोशल मीडियाच्या मदतीने आपली मदत पूरग्रस्त बांधवांपर्यंत पोहोचावी हा उद्देश ठेऊन विविध सामाजिक संस्था, संघटना आणि देवस्थान व्यवस्थापन पुढाकार घेत आहेत. परंतु पुरग्रस्तांना मदत करण्यासाठी स्वत:ची जबाबदारी अन् कर्तव्य असलेल्या आमदार आणि प्रांत,तहसीलदार यांनी चक्क सरकारी मदतीवर नाव आणि फोटो असलेले स्टिकर लावून जाहिरातबाजी करुन पूरग्रस्तांना मदत पाठविली जात आहे.

सरकारने पुरग्रस्त जनतेची भूक भागविण्यासाठी मदतीचा हात देऊ केला आहे. मात्र, सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या या मदत पॅकेटवरही आमदार, अधिकारी यांचे नाव आणि फोटो असलेले स्टिकर लावले आहे. यावर सर्वच स्तरातून संतप्त भावना व्यक्त केल्या जात असून या स्टिकरबाज अधिकाऱ्यांवर मुख्यसचिवांनी तर आमदारांवर पक्षाने कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!