कोल्‍हापूर : खासगी बसला आग; 2 तरुणांचा होरपळून मृत्‍यू

0

कोल्‍हापूरमध्ये पहाटे 4.30 च्‍या सुमारास एका खाजगी बसला आग लागली.

या आगीमध्‍ये 2 प्रवाशांचा होरपळून मृत्‍यू झाला आहे. कोल्‍हापूरातील लोंघे गावाजवळ ही दुर्घटना घडली. इतर 16 प्रवाशांना वाचवण्‍यात यश आले आहे.

आत्‍माराम ट्रॅव्‍ह्ल्सची एसी बस गोव्‍याहून मुंबईला कोल्‍हापूर मार्गे जात होती. यादरम्‍यान कोल्‍हापूरातील लोंघे गावाजवळ गगनबावडा मार्गावर पहाटे 4.30 सुमारास बसला आग लागली. ही बाब लक्षात येताच बस ड्रायव्‍हने सर्व प्रवाशांना ओढून बाहेर काढले. यादरम्‍यान काही प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्‍या.

आगीमुळे विकी भट आणि बंटी भट हे 2 तरुण मात्र 90% भाजले. यातच त्‍यांचा मृत्‍यू झाला. इतर 16 प्रवाशांना वाचवण्‍यात यश आले आहे.

नंतर ग्रामस्‍थांनी घटनास्‍थळी धाव घेत आग आटोक्‍यात आणण्‍याचा प्रयत्‍न केला. आगीचे नेमके कारण अद्याप स्‍पष्‍ट होऊ शकलेले नाही.

 

LEAVE A REPLY

*