Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

कोकणातले अतिरिक्त पाणी जायकवाडीपर्यंत

Share

प्राथमिक अभ्यासासाठी समिती नियुक्त

गंगापूर, भंडारदरा, मुळा, मुकणे धरणांच्या पाणलोट खोर्‍यात पाणी वळवण्याचा प्रस्ताव

अहमदनगर (प्रतिनिधी)- पश्‍चिम वाहिनी नदी खोर्‍यातून (कोकण) अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळविण्यासाठी एकात्मिक राज्य जल आराखड्यात प्रस्तावित योजनांबाबत अभ्यास करण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली आहे.

कोकणातील नार-पार, दमणगंगा, उल्हास व वैतरणा खोर्‍यांच्या लगत असलेल्या मराठवाड्यातील गोदावरी नदी खोर्‍यातील पुणेगाव, गंगापूर, वाघाड, करंजवन, भंडारदरा, मुळा, कडवा, मुकणे, भावली या धरणांच्या पाणलोट खोर्‍यात पाणी वळवण्याचा प्रस्ताव आहे. आंतरराज्यीय दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प व राज्यांतर्गत नार-पार-गिरणा, पार गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी व दमणगंगा-एकदरे-गोदावरी हे नदीजोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून न घेता राज्यांतर्गत्र प्रकल्पम्हणून राज्याच्या निधीतून त्वरीत हाती घेण्यात यावेत. या नदीजोड प्रकल्पामुळे मुंबई शहरासाठी 31.60 अघफू, गोदावरी खोर्‍यातील मराठवाडा भागात 25.60 अघफू व तापी खोर्‍यासाठी 10.76 अघफू पाणी कोकणातून उपलब्ध होईल असा दावा करण्यात आला आहे.

6 महिन्यांत अहवाल..
ही समिती एकात्मिक राज्य जल आराखड्यात अंतर्भूत असलेल्या पश्‍चिम वाहिनी नदी खोर्‍यातून (कोकण) मराठवाड्यात पाणी वळविण्यासाठीच्या नदीजोड योजनांचा अभ्यास करणार आहे. उपरोक्त नदीजोड योजनांच्या तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यता विषयक बाबी एकात्मिक राज्य जल आराखड्यात अंतर्भूत बाबींच्याआधारे तपासणे तसेच अंमलबजावणीसाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात येणार आहे. ही समिती यासंदर्भात 6 महिन्यांत अहवाल देणार आहे.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!