Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

आर्थिक स्वावलंबन मिळविण्यासाठी ज्ञान आवश्यक : प्रा. डॉ. लिना पांढरे

Share

कै. देशमुख महाविद्यालयाचा पदवी दान समारंभ उत्साहात

नाशिक । प्रतिनिधी

पदवीग्रहण करणे, हा क्षण विद्यार्थ्यांच्या आनंदाचा व अभिमानाचा असतो. ती ग्रहण करणे हा आयुष्यातील यशस्वीतेचा पहिला टप्पा असून आर्थिक स्वावलंबन मिळविण्यासाठी आपल्याला वेगवेगळे कौशल्ये, संगणक ज्ञान व तंत्रज्ञान समजून घेणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. लिना पांढरे यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाचा चौथा पदवीग्रहण समारंभ पुरूषोत्तम इंग्लिश स्कूलजवळील धामणकर सभागृहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि विद्यापीठ गीत सादर करून झाली. पदवीग्रहण सोहळा प्रत्येक विद्यार्थिनीपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी विद्यापीठाने हा पदवीग्रहण सोहळा घेण्याचा निर्णय घेतला व काटेकोरपणे विद्यापीठाच्या नियमानुसार तो घेण्यात येतो, असे प्रा. भास्कर नरवटे यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्ष मारुती कुलकर्णी यांनी यावेळी विद्यार्थिनींच्या अथक प्रयत्नांचा परिपाक म्हणज पदवी संपादन करणे होय. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे व जो व्यक्ती उत्तम शिक्षण घेतो त्याच्या मागे यश हमखासअ मागे येते, विद्यार्थ्यांनी आयुष्यात मूल्य जपायला हवे व उद्योजक होण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे सांगून शुभेच्छा दिल्या. यानंतर सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रकाश वारकरी यांनी केले. महाविद्यालयाचे परीक्षा प्रमुख प्रा. भास्कर नरवटे यांनी आभार मानले.

58 विद्यार्थ्यांना पदवीग्रहण

या समारंभात 58 विद्यार्थ्यांना विद्यापीठ पदवी बहाल करण्यात आली. यानंतर परीक्षा प्रमुखांनी ध्वज हाती घेऊन सर्व मान्यवर व पदवीग्रहण विद्यार्थ्यांसमवेत परतीची मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!