नाशिकच्या विद्यार्थ्यांची अनोखी कार; तासभर चार्जिंगवर १५ प्रवाशांना घेऊन ७० किमी धावणार कार
Share

के. के. वाघच्या विद्यार्थ्यांकडून इलेक्ट्रिक कारची निर्मिती
नाशिक | प्रतिनिधी
दिवसेंदिवस गगनाला भिडणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती. त्याचप्रमाणे वाढते प्रदूषण यावर उपाय आणि पर्याय म्हणून के.के.वाघ शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालातील विद्युत शाखेच्या अंतिम वर्षात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुर्णतः स्वयंचलित बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रीक ऑटो गिअर शिफ्ट कारची निर्मिती केली आहे.
या इलेक्ट्रीक कारची संपूर्ण डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग संस्थेच्या वर्कशॉपमध्ये करण्यात आले आहे ही विशेष बाब आहे. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे ब्रशलेस डि.सी 1200 व्हॉल्ट क्षमतेचे असलेले इंजिन आहे.
यामुळे ही इलेक्ट्रीक कार ताशी 45 ते 50 किमी वेगाने धावू शकते. तसेच यासाठी पूरक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. एकदा चार्जिंग केल्यावर सुमारे 60 ते 70 किमी अंतर कापते. या खेरीज यामध्ये आधुनिक स्पेअर आणि पार्ट ही कार साकारताना वापरण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, गाडीला पार्किंग सेन्सर, हॉर्न आणि स्पीड मीटरचाही यात समावेश करण्यात आला आहे.
या इलेक्ट्रीक कारचे वजन 120 किलो असून, एका वेळी 12 ते 15 व्यक्ती वाहून नेऊ शकते. महत्वाचे म्हणजे 10 सेकंदात 50 किमी इतका वेग ही कार घेऊ शकते. तसेच दीड ते दोन तासात संपूर्ण चार्जिंगदेखील या कारची पूर्ण होते.
ही कार बनविणसाठी जदिप शहा, सादिक शेख, अमोल गमे विभाग प्रमुख डॉ.बी.ई.कुशारे, विद्यार्थी मयूर शेलार, धवल तगारे, ओमकार सोनवणे, हर्षल ताजनपुरे, ऋषिकेश मोरे, अभिजित आढाव, अनिकेत साळूंखे, विनित पगारे आदींनी परिश्रम घेतले.
या अभिनव प्रकल्पाबाबत अध्यक्ष बाळासाहेब वाघ, विश्वस्त समीर वाघ, सचिव प्रा.के.एस.बंदी, प्राचार्य डॉ.के.एन.नांदूरकर यांचे मार्गदर्शन लाभले.