Type to search

Breaking News Featured क्रीडा मुख्य बातम्या

केकेआरसमोर आज राजस्थान रॉयल्सचे आव्हान

Share

कोलकाता | प्रतिनिधी

आयपीएलचे सामने सध्या जोर धरू लागले आहेत. अखेरचे सामने जिंकून प्लेऑफमध्ये खेळण्याची संधी साधण्यासाठी प्रत्येक टीम वेगवेगळे पर्याय आजमावताना दिसून येत आहेत.

दोनदा आयपीएल विजेतेपदाचा बहुमान पटकावणाऱ्या केकेआरचा सामना राजस्थान  रॉयल्स संघासोबत होत आहे. रात्री  ८ वाजता या सामन्यास प्रारंभ होईल. कोलकाता येथील ईडन गार्डन्स या मैदानावर हा सामना खेळवण्यात  येणार आहे.

दोन्ही  संघ  सध्या  गुणतालिकेत  तळाला  आहेत. राजस्थान  १० सामन्यांमध्ये  ३ विजय  आणि  ७ पराभवांमुळे  ६ गुणांसह  आठव्या  स्थानी  आहे.  तर  कोलकाताच्या खात्यात  ४ विजय  आणि  ६ पराभवांसह  ८ गुण  आहेत.

ते  सहाव्या  स्थानी  आहेत,  दोन्ही  संघांना  बाद  फेरीतील  आपले स्थान निश्चित  करण्यासाठी विजय मिळवणे  अनिवार्य  असणार  आहे.

फलंदाजीचा चुकीचा  क्रम, गोलंदाजांचा  हरवलेला  फॉर्म  यामुळे कोलकाता चिंतेत आहे.  संघाला  जर  सामना  जिंकायचा असेल  तर  त्यांना  या  चुका  सुधारणे  गरजेचे  आहे.

राजस्थान संघासाठी जमेची  बाजू  म्हणजे  अजिंक्य  राहाणेचा  परतलेला  फॉर्म.  स्टीव  स्मीथ  याने  मागील  दोन  सामन्यात  झळकावलेल्या  सलग  २ अर्धशतकांमुळे  ते कमालीचे फॉर्मात आहेत.

यासोबतच भारतीय संजू  सॅमसन हादेखील चांगल्या फॉर्मात आहे. तसेच बेन  स्ट्रोक्सकडुन  चांगली  कामगिरी  संघाला  अपेक्षित  आहे.  गोलंदाजीत  जयदेव  उनाडकट  संघासाठी  चांगलाच  महागडा  ठरत  आहे.

या  मैदानावर  एकूण ६८ हजार  प्रेक्षक  बसू  शकतात.   या मैदानावरील  पहिल्या  डावातील  सरासरी  धावसंख्या १६०  दोन्ही  संघ  आतापर्यंत  १९ वेळा  समोरासमोर  आले  असून  कोलकाताने  १० तर  राजस्थानने ९ लढती  जिंकल्या  आहेत.

या मैदानावर  हे दोन  संघ  ७ वेळा  समोर  आले  आहेत,  यात  कोलकाताने  ६ तर  राजस्थानने  १ लढत  जिंकली  आहे.

या  खेळाडूंवर  असेल  विशेष  लक्ष : आंद्रे रसेल , सुनील नारायण , स्टीव्ह स्मीथ

हवामान : अशंतः  ढगळ ५६% उष्णता  राहण्याचा  अंदाज

कोलकाता  नाईट  रायडर्सचा संघ 

सुनील  नारायण , क्रिस  लीन , रॉबिन  उथप्पा , नितीश  राणा , दिनेश  कार्तिक , रिंकू सिंग , आंद्रे  रसेल , शुभमनगील  , पियुष  चावला , कुलदीप  यादव , केसी  करिअप्पा , प्रसीद  कृष्णा , मॅट केली , लोकी  फेर्गसन , जो  देनली हॅरी गुनी , निखिल  नाईक , श्रीकांत  मुंडे , संदीप  वॉरिअर , कार्लोस  ब्रेथवेट , पृथ्वीराज  यारारा , कमलेश  नागरकोटी , शिवम  मावी , ऍड्रीचं  नॉर्टीज  दुखापतीने  बाहेर.

राजस्थान  रॉयल्सचा संघ

अजिंक्य  राहणे , स्टीव  स्मीथ , जोस  बटलर , संजू  सॅमसन , स्टुअर्ट  बिनी , प्रशांत  चोप्रा , रियन  प्राग , मनन  वोहरा , बेन  स्ट्रोक्स , जाफ्रा  आर्चर , के  गौतम , श्रेयस  गोपाल , एस्टेर्न  टर्नर , राहुल  त्रिपाठी , लिअम  लिंगविस्टन , आयारामन  बिर्ला , सुधेसेन  मिडून , महिपाल  लोणार  ईश  सोधी , ओशन  थॉमस , धवल  कुलकर्णी , वरूण  एरन , शशांकसिंग , शुभम  रांजणे , जयदेव  उनाडकट.

सलिल  परांजपे नाशिक.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!