शेतकरी एल्गारला ‘ किसान मुक्ती यात्रा’ ने बळकटी; राज्यासह परराज्यातील शेतकर्‍यांची बैठकीत हजेरी

0
नाशिक । शासनाकडून कर्जमाफीत तोंडाला पाने पुसल्याचे म्हणत राज्यातील विविध शेतकरी संघटना, संस्थांच्या आगामी शेतकरी एल्गार आंदोलनाला धार देण्यासाठी तुपसाखरे लॉन्स येथे झालेल्या सभेत, परराज्यातील शेतकर्‍यांच्या किसान मुक्ती यात्रेनेही हजेरी लावली. त्यामूळे शेतकर्‍यांच्या एल्गार बेठकीला बळकटी मिळाली.

गत 6 जुलैपासून देशातील शेतकर्‍यांनी कंद्र सरकारच्या कृषी धोरणाच्या विरोधात आवाज उठवला आहे. देशातील 160 शेतकरी संघटनांच्या समन्वयातून पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, महाराष्ट्र,गुजरात, राज्यस्थान आदी राज्यातील शेतकर्‍यांनी राष्ट्रीय किसान, मजदूर संघटनाच्या माध्यमातून एकत्र येत किसान मुक्ती यात्रा सुरु केली आहे.

मंडेसौर येथून सुरु झालेली ही शेतकरी यात्रा आज नाशिक मध्ये आली. शेतकरी यल्गार बैठकीच्या ठिकाणी त्यांंचे आगमण झाले त्यामूळे राज्यातील शेतकरी संघटना आणि देशभरातील 160 संघटना एकाच व्यासपीठावर स्थिरावल्या. राष्ट्रीय किसान, मजदूर संघटनाचे नेतृत्व व्ही.एम.सिंग यांच्या नेतृत्वात आलेली किसान मुक्ती यात्रा, राज्यात आल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजु शेट्टी, आ. बच्चु कडू, आ. जयंत पाटील यांनी तुपसाखरे लॉन्स येथे होणार्‍या शेतकरी बैठकीसाठी थांबवली. त्यामूळे परराज्यातील बटाटा उत्पादक, वटाणा उत्पादक, ऊस उत्पादक, कोबी, टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांना नाशिक मधील कांदा उत्पादक, डाळींब उत्पादक, द्राक्ष उत्पादक आणि तूर उत्पादकांच्या समस्या आपल्याच सारख्या असल्याची माहिती मिळाली.

त्यामूळे या आंदोलक शेतकर्‍यांनी बैठकीत एकमेकांचे विचार थेट व्यासपीठांवरून आदानप्रदान केले. त्यामूळे राज्यातील शेतकरी एल्गार बैठकीला चांगलीच बळकटी मिळाल्याचे चित्र तुपसाखरे लॉन्स परिसरात होते.

शेतकरी यल्गार बैठक परिसरात दूपारी नांदेड, परभरणी, विदर्भ, पश्चिम महाराष्ट., धुळे, नंदूरबार आदी जिल्ह्यातील शेतकर्‍यांची वर्दळ सुरु झाली होती. परिसरात संयोजकांनी शेतकर्‍यांना बसण्याची व्यवस्था केल्यानंतर शेतकरी संघटना, स्वाभीमानी शेतकरी संघटना, शेकाप, माकप , सत्यशोधक शेतकरी सभा आदी शेतकरी संघटनांच्या पदाधिकार्‍यांची बैठक शासकीय विश्रामगृह सुरु होती. बैठकीच्या अगोदर शेतकर्‍यांच्या व्यथा मांडणार्‍या शाहीरी जलसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते.

तसेच परिसरात समृद्धी या महामार्गाच्या विषयी असलेल्या पुस्तीका शेतकर्‍यांना वाटप करण्यात येत होत्या. सभेला विलंब होत असताना शेतकरी शाहीर जलशातून आलेल्या शेतकर्‍यांना त्यांच्या समस्या गित गायनातून उलगडून दाखवण्यात येत होत्या. हिंदी भाषिक राज्यातून सहभागी झालेल्या शेतकर्‍यांनी हिरव्या रंगाचे पंचे परिधान केलेले होते.

शेतकरी एल्गार बैठक ज्यावेळी सुरु झाली तेव्हा. आधारतीर्थ आश्रम, या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांचे संगोपण करणार्‍या संस्थेतील मुलांची रॅली सभामंडप आली. बालकांच्या हाती शेतकर्‍यांना आत्महत्या करून नका, असे आवाहन करणारे फलक होते. तसेच समृद्धी या महामार्गाला विरोध करणार्‍या शेतकर्‍यांनीही भुसंपादनाला विरोध करणार्‍या फलके बैठकीत झळकवली होती. शेतकर्‍यांच्या बैठकीत अनुचीत प्रकार घडू नये म्हणून पोलिस बंदोबस्त होता.

LEAVE A REPLY

*