देव देश धर्माची सेवा करणारा खरा देशपूत्र

संतोष महाराज आढ़ावनेकर यांचे गिरणारे येथे कीर्तन निरूपण

0

गिरणारे ता ३१ : मानवाने आपल्या प्रापंचिक जीवनात अतिरिक्त अभिलाषा सोडून द्यावी, जन्म मृत्यूच्या फेरयात न-अड़कता अनन्य भावाने भगवंताला शरण जावे, तसेच देव् देश धर्माची निष्ठा पूर्वक सेवा करावी, जीवनात व्यसनमुक्त, सेवाभावी वृति जोपासावी, आपल्या देशाची सांस्कृतिक सामाजिक परंपरा जोपासावी अशे आवाहन पर कीर्तन निरूपण गिरणारे(ता. नाशिक) येथे करण्यात आले.

गिरणारे ता.नाशिक येथील बारभाई विठ्ठल रखुमाई  मंदिरात सुरू असलेल्या तसेच शेकडो वर्षाची परंपरा लाभलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या तिसऱ्या दिवसाचे कीर्तन निरूपण ह.भ.संतोष महाराज यांनी केले.

संत तुकोबारायांचा अभंग घेवून त्यांनी मानवी जीवनात प्रारंभ जन्माने तर शेवट मृत्युने होत असतो, जन्माचा आनंद मानव साजरा करतो मात्र मृत्यूचे त्याला भय वाटते यातून मार्ग एकच देवाला अनन्यभावाने शरण जावे भक्तिमार्गाची संतांची परंपरा शेकडो वर्षे वारी,अखंड हरिनामाच्या माध्यमातून अखंड सुरु आहे.ही परंपरा सामाजिक परिवर्तनाची परंपरा व्हावी यासाठी हे आध्यात्मिक व्यासपीठ कीर्तन प्रवचन कथेच्या माध्यमातून सुरु आहे, या भवसागरात या तरुन जा असे त्यांनी शेवटी सांगितले.

ततपुर्वी दुपारच्या सत्रांत झालेल्या संगीत महाभारत कथेत कथाकार महंत समाधान महाराज भोजेकर यांचे वाणीतून झाले, यावेळी त्यांनी ज्ञान भक्ति कर्म ज्या देशात आहे त्या हिन्दुस्थानात शेकडो वर्षे रंजल्या गांजललेल्यांची सेवा करण्याची संस्कृति, सेवा सत्कर्म, देशभक्ति असणारी नीति आहे.

या देशातील कणखर महापराक्रमी शूरवीर शिवरायांच्या पराक्रमातून स्वराज्य आलंय. पूर्वापार आपल्या परंपरेत आपल्या देशातील महान राजा भरत राज्याने असा पराक्रम केला समस्त भारताचा राजा होवून येथील रयतेवर पुत्रवत प्रेम केले. अशा निष्टावान पराक्रमी राज्याच्या कर्तृत्वाने भारत नावाने हा देश ओळखला जावू लागला असे कथा निरूपण त्यांनी केले. यावेळी गिरणारे गाव परिसरातून हजारो श्रोते यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*