Thursday, May 2, 2024
Homeजळगावकिन्नरची गळफास घेवून आत्महत्या

किन्नरची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

सुप्रिम कॉलनीतील तराणा (Tarana ) उर्फ रहीम शेख रयास ( Rahim Sheikh Ryas) (वय-24, ह. मु. दहीगाव ता. यावल) या किन्नरने (Kinner) राहत्या घरात ओढणीने गळफास घेवून आत्महत्या (suicide) केल्याची घटना सकाळी उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस (police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

यावल तालुक्यातील दहिगाव येथील तराणा उर्फ रहीम ही गेल्या चार महिन्यांपुर्वी सुरत येथून जळगावात आली होती. सुप्रिम कॉलनीत ती एकटीच भाड्याच्या घरात राहत होती. दरम्यान, तीचा लहान भाऊ हुसेन शेख रयास हा तीच्या घरासमोर आपल्या पत्नीसह वास्तव्यास होता. गुरुवारी रात्री तराणा हीने आपल्या भावाकडे जेवण केले त्यानंतर ती आपल्या घरी निघुन गेली.

आज सकाळच्या सुमारास हुसेन याची पत्नी तराणा हीला चहा घेण्यासाठी बोलवायला गेली असता, तराणाच्या घराचा दरवाजा आतून बंद होता. बराचवेळ दरवाजा ठोठवला तरी आतून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी खिडकीतून आत डोकावून बघितले. यावेळी तराणा हीने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याचे त्यांना दिसून आले.

पोलिसांची घटनास्थळी धाव

हुसेन यांच्या पत्नीने घटनेची माहिती आपल्या पतीला देतात त्यांनी तात्काळ तराणा याच्या घरी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. यावेळी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे कर्मचारी गणेश शिरसाळे व संदीप धनगर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर नागरिकांच्या मदतीने तराणाला हीला खाली उतरवित मृतदेह शासकीय वैद्यकीय महविद्यालय व रुग्णालयात दाखल केला.

तराणा हीने गुरुवारी रात्री उशिरापर्यंत तीच्या घरात गाणे वाजवित होती. त्यानंतर तीने मध्यरात्रीच्या सुमारास गळफास घेवून आत्महत्या केली. तीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिच्या पश्चात वडील, दोन भाऊ, वहिनी, बहिण असा परिवार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या