कोयत्याने वार करून एकाची हत्या; माळेगाव एमआयडीसीतील घटना

0
सिन्नर |  माळेगाव एमआयडीसीमध्ये एकावर कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.

येथील एफडीसी कंपनीच्या समोर शिवा तुकाराम जगतापवर(वय 24 रा. विजयनगर , सिन्नर)  धारदार कोयत्याने वार करण्यात आले.

दुचाकीवरून आलेल्या दोघांनी कोयत्याने वार केले असल्याची प्राथमिक माहिती आहे. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या शिवाला रुग्णालयात हलवत असताना त्याचा मृत्यू झाला.

तो एफडीसी कंपनीत कंत्राटी तत्वावर कामाला असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

*