किल्ले तोरणा येथे दुर्ग संवर्धन स्वच्छता अभियान

0

लोणी (प्रतिनिधी)- रणझुंजार मराठा जागर व शिवकार्यच लय भारी या शिव समूहांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले तोरणा उर्फ प्रचंडगड येथे दुर्गसंवर्धन स्वच्छता अभियान नुकतेच राबविण्यात आले. शिवव्याख्यात्या सौ. अनिताताई नळे व गजानन महाराज देठे यांच्या मार्गदर्शनाखाली या तोरणा मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
पुणे जिल्ह्यातील सर्वात उंच असा तोरणा किल्ला असून, प्रचंड विस्तारामुळे या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रचंडगड असे नाव दिले होते. किल्ले म्हणजे महाराष्ट्राची शान, शिवरायांचे श्वास, म्हणूनच ही शान आणि श्वास जपणे हे मराठ्यांचे कर्तव्य आहे. या किल्ल्यांच्या रूपाने शिवराय आजही आपल्यातच आहेत. त्यासाठीच रणझुंजार मराठा जागर व शिवकार्यच लय भारी या दोन्ही समूहाच्या वतीने दुर्गसंवर्धन आणि किल्यावरील स्वच्छता मोहीम सातत्याने राबविण्यात येते.

या वर्षी नुकतीच या समूहाने तोरणा मोहीम आखली होती. यामध्ये विठ्ठलराव घोगरे, उत्तमराव नळे, शंकरराव वाबळे, सचिन वाबळे, सतीश वर्पे, दीपक गांगुर्डे, समाधान गांगुर्डे, राहुल रिकामे, कैलास जाधव, सुभाष जेधे, सोमनाथ गांगुर्डे, विनोद गांगुर्डे, किरण गांगुर्डे, भाऊराव पगार, अनिल गव्हाणे, अभिजीत जाधव, राज माने, अभिजीत बळे आदी सहभागी झाले होते. नऊ वर्षांच्या मुलीपासून 65 वर्षांचे आजोबा या मोहिमेकडे सहभागी झाले होते. किल्ला म्हणजे अखंड प्रेरणास्त्रोत आहे. हे प्रेरणास्त्रोत स्वच्छ, सुंदर व पवित्र राहावयास हवेत. त्यासाठी सर्वांनी आत्मपरीक्षणा सोबतच कृतिशील होणे गरजेचे आहे. हे रणझुंजार मराठा जागर व शिवकार्यच लय भारी या दोन्ही समूहांनी या किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवून आपल्या कृतीतून दाखवून दिले.

LEAVE A REPLY

*