किडनी निकामी का होते?

0

किडनी हा आपल्या शरीरातील एक महत्वाचा अवयव आहे. आपल्या शरीरातील रक्त शुद्धकरण्याचे काम किडनी करतात. शरीरामध्ये पाणी आणि खनिज द्रव्येयांचे संतुलन राखण्याचे काम देखील किडनीचेच असते. किडनीची काम करण्याची क्षमता कमी झाली की,त्याला किडनी फेल्यूअर म्हणतात,जी एक गंभीर अवस्था आहे. मधुमेही रूग्णांची किडनी खराब होण्याची शक्यता जास्त असते. सामान्यतः 20 ते 30 टक्के मधुमेही रूग्णांमध्ये किडनी फेल्यूअरची समस्या आढळते. या स्थितीला डायबेटिक नेफरोपॅथी म्हटले जाते.

किडनी फेल्यूअरच्या अनेक कारणांपैकी महत्वाचे कारण म्हणजे मधुमेह. डायलिसिसकरुन घेणार्‍या 100 रूग्णांमधील 35 ते 40 रूग्णांमध्ये किडनी फेल्यूअरचे कारण हे मधुमेह असते. मधुमेहामुळे किडनीवर होणारा परिणामावर वेळीच उपचार केल्यास गंभीर किडनी फेल्यूअर टाळता येऊ शकते.

किडनी निकामी कशी होते? : किडनीमधुन प्रतिमिनिटाला सुमारे 1200 मिली लीटर रक्तशुद्ध होते. मधुमेह आटोक्यात नसल्यास किडनीमधून शुद्ध होऊन जाणार्‍या रक्ताचे प्रमाण 40 टक्क्यांनी वाढते. यामुळे किडनीवर ताण येतो आणि त्याचे विपरित परिणाम होतात. फार काळ किडनीवर असा ताण येत राहिल्यास रक्ताचा दाब वाढतो आणि त्याचा परिणाम किडनीवर होतो.

लक्षणे :चेहरा, पाय आणि डोळ्यांवर सूज येणे, भूक न लागणे, थकवा, उलटी,अशक्तपणा, कमी वयात उच्च किंवा कमी रक्तदाब, कंबरेच्या खाली वेदना होणे इत्यादी किडनी रोगाची लक्षणे असू शकतात. अशी लक्षणे दिसू लागताच त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

किडनी फेल्यूअर होण्याचा धोका 5 ते 15 वर्षापर्यंत मधूमेह असणे. अनुवंशिक कारणे. उच्च रक्तदाब. रक्तातील साखर नियंत्रित न झाल्यास. मधुमेह असणार्‍या व्यक्तिंनी धूम्रपान केल्यास . कमी वयात मधुमेह होणे. खुप काळासाठी मधुमेह असणे. डायबेटिक नेफरोपॅथी म्हणजे किडनी निकामी होणे नव्हे. तुमच्या डॉक्टरनी तुम्हाला सांगितले असेल की, मधुमेहामुळे तुमच्या किडनीवर परिणाम होत आहे आणि डायबेटिक नेफरोपॅथीला सुरूवात झाली आहे. याचा अर्थ असा नव्हे की, तुमची किडनी निकामी झाली आहे. डायबेटिक नेफरोपॅथीच्या सुरूवातीला रूग्णाला फारसा त्रास जाणवत नाही. अनेकदा किडनी 80 टक्के खराब झाल्यानंतर लक्षणे दिसायला सुरूवात होते. त्यावेळी पायांवर सूज येणे, अशक्तपणा जाणवणे, उलटी होणे, भूक न लागणे अशी लक्षणे दिसू लागतात. म्हणूनच मधुमेही रूग्णांनी वर्षातून किमान एकवेळा मायक्रल टेस्ट करवून मायक्रो अल्बुमिन युरियापॉझीटिव्ह आहे की नाही, हे जाणून घेणे गरजेचे आहे. मायक्रल टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर फक्त मधुमेहामुळे किडनीवर काही विपरित परिणाम झालेत का हे समजू शकते. यावर वेळेत उपचार केले गेले तर भविष्यात किडनी फेल होण्यापासून वाचवता येते. लवकर उपचार सुरू केल्याने डायलिसिस आणि किडनी प्रत्यारोपण सारखे अवघड उपचार लांबणीवर टाकता येतात.

LEAVE A REPLY

*