Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच मार्केट बझ मुख्य बातम्या

किया मोटर्सची एसयूव्ही सेल्टोस भारतात लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये

Share

मुंबई | प्रतिनिधी

जगातील आठव्या क्रमांकाच्या सर्वांत मोठ्या वाहनकंपनी असलेल्या किया मोटर्सने भारतात मीडएसयूव्ही विभागातील पहिली सेल्टोस  एसयुव्ही कार भारतीय बाजारपेठेत आणण्याची तयारी दर्शिवली आहे.

९.६९ लाख रुपयांपासून ही कार भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. तसेच याच कारचे सर्वोच्च मॉडेल १५.९९  लाख रुपये इतके आहे. सेल्टोस ही गाडी बीएसफोरची पूर्तता करणारी असूनपेट्रोल व डिझेल अशा दोन्ही प्रकारांत तसेच मॅन्युअल व ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असा दोन्ही पर्यायांत उपलब्ध आहे.

सेल्टोससाठी आत्तापर्यंत ३२,०३५  बुकिंग्ज झाली असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. सेल्टोसला बाजारात असलेली प्रचंड मागणी पूर्ण करण्यासाठी किया मोटर्स इंडिया सुसज्ज असून कंपनीच्या अनंतपूर येथील कारखान्याकडे ३ लाख वाहनांचे उत्पादन करण्याची  वार्षिक क्षमता असल्याचे याप्रसंगी सांगण्यात आले आहे. 

किया मोटर्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी कूखयुन शिम याप्रसंगी म्हणाले की, सेल्टोस हा किया मोटर्ससाठी सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. सेल्टोसच्या माध्यमातून कियाने भारतात प्रवेश केला आहेत्यामुळे आम्ही या उत्पादनाच्या तत्पर आहोत. सेल्टोस म्हणजे उच्च दर्जाच्या सुविधावैशिष्ट्यपूर्ण डिझाइनश्रेष्ठ दर्जा, शक्तिशाली इंजिनांचे पर्याय अशा अनेक घटकांसह प्रत्येकासाठी सुखद आश्चर्याचा धक्का आहे.

ही आहेत वैशिष्ट्ये

  • सिक्सस्पीड मॅन्युअल/सेव्हन स्पीड डीसीटीसह स्मार्टस्ट्रीम १.४ टर्बो पेट्रोल इंजिनमध्ये सेल्टोस उपलब्ध
  • सिक्स स्पीड मॅन्युअल/सिक्स स्पीड ऑटोमॅटिक आणि सिक्स स्पीड मॅन्युअल/आयव्हीटीसह स्मार्टस्ट्रीम १.५ पेट्रोल इंजिनमध्येही उपलब्ध
  • सर्व इंजिन्स बीएसफोर नियमांची पूर्तता करणारी
  • सेल्टोसमध्ये दोन भिन्न डिझाइन लाइन्स आहेत– कुटुंबकेंद्री ग्राहकांसाठी टेक लाइन आणि मनाने तरुण असलेल्या कारप्रेमींसाठी जीटी लाइन
  • सेल्टोस श्रेणीममध्ये ८ इंची हेड्सअपडिसप्ले१०.२५ इंची एचडी टचस्क्रीनहायटेक साउंड मूड लॅम्परीअर शेड कर्टन३६० डिग्री सराउंड व्ह्यू मॉनिटरब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंगजगातील पहिला कनेक्टेड एअरप्युरिफायरगाडीसोबत वायरलेस व अखंडित जोडलेले राहण्यासाठी ३७ सुविधांनी युक्त  अशी स्वतविकसित केलेली अतिप्रगत यूव्हीओ कनेक्ट प्रणालीसाउंड मूड लॅम्पसह  एटस्पीकर बोस हायफाय साउंड सिस्टम आणि यांसारख्या अनेक अव्वल दर्जाच्या व स्मार्ट सुविधात यात आहेत.
  • ईएससीव्हीएसम६ एअरबॅग्जएएचएसएसप्रगत हाय स्ट्रेंग्थ व्हील यांसारख्या सुरक्षा आहेत
Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!