महाराष्ट्राचे दोन्ही संघ उपउपांत्य फेरीत

0
नाशिक | दि. २७ प्रतिनिधी – जिल्हा खो-खो संघटना आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे आयोजित २८ राष्ट्रीय सबज्युनियर खो-खो स्पर्धेच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्राच्या दोन्ही संघानी उपउपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मुलींच्या संघाने दिल्लीचा १६-०३ तर मुलांच्या संघाने कर्नाटकाचा १४-११ असा पराभव करून उपउपात्य फेरी गाठली.

बाद फेरीत मुलींच्या उपउपात्यपूर्व सामन्यात महाराष्ट्र संघाने दिल्लीचा १६ विरुद्ध ०३ अशा मोठ्या फरकाने पराभव केला. महाराष्ट्राकडून खेळताना रितीका मगदुनने २.२० मिनिटे पळतीचा खेळ करून दोन गडीही बाद केले. तर साहसी सर्जेने ३.२० मिनिटे पळतीचा खेळ केला आणि ३ गाडी टिपले. गौरी शेंडेने आक्रमण करतांना तीन गडी बाद केले. तर साक्षी वाळेकरने १. १० मिनिट पळतीचा खेळ करतांना दोन गड्यांना परतीचा रस्ता दाखवला. तसेच ऋतुका राठोड २, मयुरी पवार १ गडी बाद करत दिल्लीचे आवाहन संपुष्ठात आणले.
मुलीप्रमाणे महाराष्ट्राच्या मुलांनीही बलाढ्य कर्नाटकचे आवाहान संपुष्ठात आणले. महाराष्ट्राकडून खेळणार्‍या नाशिकच्या चंदू चावरेने सामन्यात संरक्षणात ३.३० मिनिटे पळतीचा खेळ करून तब्बल १० गडी बाद केले. सचिन आहेरने १.१० मिनिटे पळतांना तीन गडीही टिपले. तारशुभम थोरातने २ पळतीचा खेळ करतांना दोन गाडयांना बाद केले.

या सर्वांच्या कामगिरीमुळे महाराष्ट्राला कर्नाटकवार १४-११ असा विजय मिळविता आला. मुलांच्या इतर सामन्यात आंध्र प्रदेशने विदर्भाचा १०-०४, कोल्हापूरने पॉण्डेचेरीचा १४-१०, तेलगानाने पश्चिम बंगालचा १२-०७ असा पराभव केला. मुलीमध्ये कर्नाटकाने उत्तर प्रदेशला १२-०३ , ओरिसाने विदर्भला १३-०६, झारखंडने गुजराथला १७-१६ तर केरळने हरायणाला १०-०८ असे पराभूत करून उपउपांत्य फेरी गाठली.

पवारांच्या हस्ते बक्षिस वितरण
स्पर्धेचा आज अंतिम सामना होणार असून सायंकाळी ४ वाजता राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित बक्षिस वितरण होणार आहे. प्रसंगी आमदार बाळासाहेब सानप, आ.देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. डॉ. सुधीर तांबे, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सचिव राजीव मेहेता, सचिव सुरेश शर्मा उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती स्पर्धेचे प्रमुख आयोजक नाशिक जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष रमेश भोसले यांनी दिली.

 • उपउपांत्य पूर्व सामन्यांचे निकाल
 • मुले :
  १) महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक (महाराष्ट्र विजयी १४-११)
  २) कोल्हापूर विरुद्ध राजस्थान( कोल्हापूर विजयी १४-१०)
  ३) तेलगाना विरुद्ध बंगाल (तेलंगाना विजयी १२-०७)
  ४) केरळ विरुद्ध गुजराथ (केरळ विजयी १३ -०९)
  ५) उ. प्रदेश विरुद्ध छत्तीसगड (उ.प्रदेश १४-१२)
 • मुली :
  १) महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली (महाराष्ट्र विजयी १०-०३)
  २) ओरिसा विरुद्ध विदर्भ (ओरिसा विजयी ३० -०६)
  ३) केरळ विरुद्ध हरयाणा (केरळ विजयी १०-०८)
  ४) झारखंड विरुद्ध गुजराथ (झारखंड विजयी १७ -१६)
  ५) आंध्र विरुद्ध मध्य प्रदेश (आंध्र विजयी १०-०३ )
  ६) प. बंगाल विरुद्ध पॉंडेचेरी (प. बंगाल विजयी ०८-०६)
  ७) तामिळनाडू विरुद्ध कोल्हापूर (तामिळनाडू विजयी १०-९)

LEAVE A REPLY

*