
नंदुरबार Nandurbar | प्रतिनिधी-
नंदुरबार (Nandurbar) व धुळे (Dhule) जिल्हा परिषद गट (Zilla Parishad Group) व पंचायत समिती (Panchayat Samiti) गणातील रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा (By-election) कार्यक्रम जाहीर झाला आहे.दि. १७ मे पासून उमेदवारी अर्ज (Candidature application) दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार असून ५ जून रोजी मतदान घेण्यात येणार असून ६ जूनला मतमोजणी (Counting of votes) होणार आहे. नंदुरबार जिल्हयातील चितवी ता.नवापूर जि.प.गट व धडगाव तालुक्यातील असली पंचायत समिती व धुळे जिल्हयातील शिरपूर तालुक्यातील हिसाळे पं.स.गण, साक्री तालुक्यातील हट्टी खु. पं.स.गणाचा समावेश आहे. पोटनिवडणूकीचा यात समावेश आहे.
नंदुरबार व धुळे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणातील रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम (By-election program) जाहीर झाला आहे.
दि. १७ ते २३ मे दरम्यान उमेदवारी अर्ज विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. दि. २४ मे रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यत येणार आहे. त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
दि. २७ मे रोजी नामनिर्देशनपत्राचा स्विकार करण्याबाबत किंवा नामंजूर करण्याबाबतचा निवडणूक निर्णय अधिकार्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधिशांकडे अपिल करण्याची मुदत आहे. दि. ३० मे रोजी जिल्हा न्यायाधिश अपिलावर सुनावणी करुन निकाल देतील.
त्याच दिवशी अपिलावर सुनावणी व निकाली काढल्यावर वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याच दिवशी जेथे अपिल नाही अशा उमेदवारी अर्जांची माघारीची मुदत आहे. दि. १ जून रोजी ज्या अर्जांवर अपिल आहे तेथे उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे.
दि.३० मे रोजी निवडणूक लढविणार्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. ५ जून रोजी सकाळी ७.३० ते ५.३० दरम्यान मतदान घेण्यात येणार आहे. दि.६ जून रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.
या पोटनिवडणुकीमध्ये नंदुरबार जिल्हयातील नवापूर तालुक्यातील चितवी जि.प.गट, अक्राणी तालुक्यातील असली पंचायत समिती गण तसेच धुळे जिल्हयातील शिरपूर तालुक्यातील हिसाळे पं.स.गण, साक्री तालुक्यातील हट्टी खु. पं.स.गणाचा समावेश आहे.