जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक मतदारांना भरपगारी सुटी द्यावी

जिल्हा सरकारी कामगार अधिकारी अ. ज. रुईकर यांची आस्थापनांना सूचना
जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक मतदारांना भरपगारी सुटी द्यावी

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

नंदुरबार जिल्हा परिषद (Zilla Parishad) व त्याअंतर्गत येणार्‍या पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) पोटनिवडणुकीसाठी (election voters) मंगळवार दि.5 ऑक्टोबर 2021 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी संबंधित मतदारांना भरपगारी सुटी किंवा पुरेशी सवलत (compensatory leave) द्यावी, अशा सूचना जिल्हा सरकारी कामगार अधिकारी अ. ज. रुईकर (District Government Labor Officer a. H. Ruiker) यांनी दिल्या आहेत.

श्री. रुईकर यांनी म्हटले आहे, लोकप्रतिनिधी कायद्यानुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून भरपगारी सुटी देण्यात येते किंवा काही ठिकाणी कामाच्या तासांत योग्य ती सवलत देण्यात येते. मात्र, गेल्या काही निवडणुकांमध्ये संस्था, आस्थापना भरपगारी सुटी किंवा सवलत देत नाहीत, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मतदार मतदानापासून वंचीत राहतात. ही बाब लोकशाहीसाठी घातक आहे.

राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार दि.5 ऑक्टोबर 2021 रोजी नंदुरबार जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणार्‍या पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने पुढील आदेश दिले आहेत. त्यात म्हटले आहे, की निवडणूक होणार्‍या क्षेत्राबाहेर कार्यरत असले, तरी ही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.

ही सुट्टी उद्योग ऊर्जा व कामगार विभाग अंतर्गत येणार्‍या सर्व आस्थापना, कारखाने दुकाने आदींना लागू राहील (उदाहरणार्थ खासगी कंपन्यांमधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स आदी).अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचार्‍यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल, तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी दोन ते तीन तासांची सवलत देता येईल.

मात्र, त्याबाबत त्यांनी संबंधित जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे देणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधितांसोबत मालकांनी घेणे आवश्यक राहील. उद्योग व कामगार विभागांतर्गत येणार्‍या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींचे मालक, व्यवस्थापनांनी वरील सूचनांचे पालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी.

मतदारांकडून मतदानासाठी सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल. सर्व उद्योजक, आस्थापना, मालकांनी त्यांच्या उद्योगात, आस्थापनेत कार्यरत असलेल्या मतदारांना मतदार कामगार, अधिकारी, कर्मचार्‍यांना वर नमूद केल्याप्रमाणे सुट्टी अथवा सवलत द्यावी.

Related Stories

No stories found.