युवक राष्ट्रवादी काँग्रेसने दिली पंतप्रधानांना भाजीपाला,चणे, कडधान्याची भेट

राष्ट्रवादी काँग्रेसकडून महागाईचा निषेध
युवक राष्ट्रवादी काँग्रेसने दिली पंतप्रधानांना भाजीपाला,चणे, कडधान्याची भेट

नवापूर Navapur । श.प्र.-

सध्या देशात महागाई (Inflation) चांगलेच जाळे पसरवित आहे. यातच खताच्या वाढत्या दरवाढीमुळे (Rising fertilizer prices) शेतकरी राजा त्रस्त झाला आहे. या खत दरवाढीविरोधात नवापूर युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे (Youth Nationalist Congress) तालुका अध्यक्ष आकाश गावित यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांना भाजीपाला, चणे, गौर्‍या, कडधान्य जीवनावश्यक वस्तू (Essentials) कुरियरच्या (Courier) माध्यमातून भेट दिली आहे. दरवाढीबद्दल मोदी सरकारचा नवापूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त केला आहे.

देशात जीवनावश्यक वस्तूंसह पेट्रोल इंधन दरवाढ (Fuel price hike) होत असतानाच मोदी सरकारने (Modi government) खताचे भाववाढ करून शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. या वाढत्या खताच्या दरवाढीमुळे आर्थिक संकटात (financial crisis) असलेल्या शेतकरी (Farmers) राजाच्या संकटात मोदी सरकारने भर घातली आहे. नैसर्गिक आपत्ती दरवाढीचा फटका, शेतीमालाला योग्य भाव नाही अशा एक ना अनेक संकटात असताना खताच्या दरवाढीमुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

या शेतकर्‍यांची बाजू मांडत व मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी नवापूर युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Youth Nationalist Congress) वतीने तालुका अध्यक्ष आकाश गावित यांनी गौरी, भाजीपाला, चणे, कडधान्य, जीवनावश्यक वस्तू कुरियरच्या (Courier) माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट केले आहेत.

यावेळी नवापूर राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष आकाश गावित, तालुका उपाध्यक्ष कान्हा सातारकर, शहर उपाध्यक्ष अजय कुराडे, शाहरुख मेमन, प्रफुल्ल वसावे, महेश वसावे आदी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com