वरुळ कानडी येथे अती दारूमुळे युवकाचा मृत्यू

वरुळ कानडी येथे अती दारूमुळे युवकाचा मृत्यू

नंदूरबार Nandurbar l प्रतिनिधी

शहादा तालुक्यातील वरुळ कानडी (Varul Kandi)येथे अती दारूमुळे (drinking) युवकाचा (Youth) मृत्यू (dies) झाल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी सारंगखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.२४ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास बिलाडी ता.शहादा येथील अनिल भाईदास गिरासे यांच्या ससदे शिवारातील गव्हाच्या शेतात शहादा तालुक्यातील वरुळ कानडी येथील मुन्ना जंगा ठाकरे यांचा मृतदेह आढळून आला. दारू पिण्याची सवय असल्याने अती दारूच्या सेवनात थंडीच्या कडाक्यात त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मयताचा चुलतभाऊ रमेश सुभाष ठाकरे यांच्या खबरीवरून सारंगखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सारंगखेडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. प्रमोद वळवी करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com