कार अपघातात तरुणाचा मृत्यू

कार अपघातात तरुणाचा मृत्यू

शहादा Shahada । ता.प्र. -

वाल्हेरी (ता.तळोदा) येथील धबधब्यावर पर्यटन करून शहाद्याकडे परतणार्‍या भरधाव कारचा डामरखेडा-प्रकाशा दरम्यान गोमाई नदीवर असलेल्या पुलाजवळ शुक्रवारी अपघात (car accident) झाला. त्यात एक तरुण ठार (Youth dies) तर एकाची प्रकृती गंभीर असून इतर चार जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर शहादा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शहरातील आठ महाविद्यालयीन तरुण कार (क्र.एम.एच.39 ए.ए.8989) ने तळोदा तालुक्यातील वाल्हेरी धबधबा येथे पर्यटनासाठी गेले होते. सायंकाळी शहाद्याकडे परतत असतांना सात ते साडेसात वाजेच्या दरम्यान डामरखेडा प्रकाशा दरम्यान असलेल्या गोमाई नदीवरील पुलाजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्यावरून खाली शेतात जाऊन तीन ते चार वेळा उलटली. गाडीतील सर्व तरुण जखमी झाले.

यात वाहन चालक राजप्रिय जाधव, तन्मय लांडगे, अभय वाघ, अभिषेक चौधरी, जयेश चौधरी, पियुष पाटील, उमेश राजपूत व अजय यांचा समावेश होता. अपघात झाल्यानंतर तात्काळ रस्त्यावरून येणार्‍या जाणार्‍यांनी जखमींना गाडीतून बाहेर काढले. त्याचवेळी सुदैवाने नंदुरबार येथून शासकीय रुग्णवाहिका रुग्णांना सोडून शहाद्याकडे येत असताना तिला थांबवून त्यात जखमींना तात्काळ शहादा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, उपचार सुरू असताना अभय वाघ याचा रात्री उशिरा मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची वार्ता कर्णोपकर्णी शहरात पसरल्यानंतर शहरातील सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, समाजबांधव यांनी रात्री रुग्णालयात धाव घेत मदतकार्य केले. अपघातात उपचारादरम्यान अभय वाघ याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण शोककळा पसरली आहे.

दरम्यान, वाहनचालक राजप्रिय राजेंद्र जाधव (वय 23) याच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक माया राजपूत करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com