
नवापूर Nawapur । श.प्र.-
नवापूर शहरातील लाकडी फर्निचरचा व्यवसाय(Wooden furniture business) करणारे व्यापारी हनिफ शेख यांचा एकुलता एक मुलगा (Youth) मोहसीन शेख याने आपल्या फर्निचर मार्टमध्ये गळफास घेऊन आत्महत्या (Suicide by hanging) केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
हनिफ शेख यांचा शहरातील राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला आदर्शनगर परिसरात लाकडी फर्निचर व जळाऊ लाकडाचा व्यवसाय आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा मोहसीन हनिफ शेख आपल्या वडिलांना व्यवसायात मदत करत होता. आज सकाळी सहा ते सात वाजेदरम्यान फर्निचर मार्टमधील काम करणार्या मिस्त्री कामावर आले. दरवाजा बंद बघून त्यांनी सदर युवकाला फोन केला. परंतू त्याने फोन उचलला नाही. म्हणून त्यांनी दरवाजातून डोकावून बघितले तर युवक गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. लागलीच नातेवाईकांना बोलावले असता सदर युवकाला उप जिल्हारुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यावेळी नातेवाईकांनी एकच गर्दी केली.
उच्चशिक्षित युवक मोहसीन शेख वय 33 याने नैराश्येतून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. नवापूर पोलिसात सदर घटनेची नोंद झाली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ.दादाभाई वाघ व नितीन नाईक करीत आहेत.