रेल्वे स्थानकाजवळ गळफास घेवून युवकाची आत्महत्या

 रेल्वे स्थानकाजवळ गळफास घेवून युवकाची आत्महत्या

नंदुरबार Nandurbar। प्रतिनिधी

नंदुरबार शहरातील रेल्वेस्थानकाच्या (railway station) सुरक्षा भिंतीजवळील एका झाडाला अज्ञात 30 वर्षीय युवकाने (Youth) गळफास (hanging) घेवून आत्महत्या (suicide) केल्याची घटना घडली. याप्रकरणी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 रेल्वे स्थानकाजवळ गळफास घेवून युवकाची आत्महत्या
शहाद्याच्या सुपूत्राने केले ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शन

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या पटेलवाडीत जवळील सुरक्षा भिंतीलागून असलेल्या झाडाला अज्ञात पुरूष जातीचा अंदाजीत 30 वर्ष इसमाने गळफास (hanging) घेवून आत्महत्या (suicide) केली. याबाबत दुपारी 1 वाजेच्या सुमारास स्टेशनमास्तर यांना याबाबत माहिती मिळाली. त्यांनी याबाबत पोलीसांना (police) कळविले.

सदर इसमास जिल्हा रूग्णालय (District Hospital) नंदुरबार येथे औषधोपचार उपचारासाठी दाखल केले असता तेथील डॉ.नितीन पाडवी यांनी या इसमास मृत घोषीत केले. मोहन रावसाहेब सुळ रा.संभाजीनगर (नंदुरबार) यांच्या खबरीवरून नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक रतिलाल पाडवी करीत आहेत.

 रेल्वे स्थानकाजवळ गळफास घेवून युवकाची आत्महत्या
चुंचाळ्यात उद्या साजरा होतोय गुरूशिष्य पुण्यतिथीचा अनोखा सोहळा

Related Stories

No stories found.