लग्नात नाचतांना धक्का लागल्याने केलेल्या मारहाणीत तरूणाचा मृत्यू

लग्नात नाचतांना धक्का लागल्याने केलेल्या मारहाणीत तरूणाचा मृत्यू

मोदलपाडा Modalpada । वार्ताहर

तळोदा शहरातील एका लग्नाच्या (wedding) कार्यक्रमात नाचताना (dancing) धक्का लागल्याने तरुणास (Young man) बेदम मारहाण (beating) केल्याने त्याचा मृत्यू (dies) झाल्या. या प्रकरणी चौघा विरोधात पोलिसात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पोलिसांनी ताब्यात देखील घेतले आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका हाटीत शुक्रवारी लग्नाचा (wedding) कार्यक्रम होता. या कार्यक्रमात संदीप सुनील पाडवी (वय 18, रा.कोहली हटी) हादेखील नाचत होता. नाचताना (dancing) त्याचा धक्का लागल्याने लव सोना पाडवी, कुश सोना पाडवी, सूरज रवींद्र पाडवी, रोहित रवी पाडवी (सर्व रा.पाडवी गल्ली) यांनी संदीप यास बेदम मारहाण (beating) केली.त्यामुळे त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार घेताना त्याचा मृत्यू (dies)पावला.

या प्रकरणी विजयसिंग पाडवी यांच्या फिर्यादीवरून चारही आरोपी विरोधात खुनाच्या गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अविनाश केदार करीत आहेत. पोलिसांनी चारही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

उपविभागीय पोलिस अधिकार्‍यांची भेट

खूनाच्या घटनेची माहिती मिळताच अक्कलकुवा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी (Sub-Divisional Police Officer) संभाजी सावंत व पोलिस निरीक्षक केलसींग पावरा यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी घटनेची माहिती घेतली.

दरम्यान नंदुरबार येथून फॉरेन्सिक लॅब पथकही मागविण्यात आले होते. या पथकाने घटनास्थळी भेट दिली.

Related Stories

No stories found.