
नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR
तालुक्यातील ढंढाणे (Dhandane) शिवारात आज सायंकाळी वीज (lightning) पडून २४ वर्षीय तरुणाचा (Young laborer) मृत्यू (killed) झाल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, नंदुरबार जिल्हयात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण पसरले असून पावसाचे वातावरण होते. सायंकाळच्या सुमारास जिल्हयातील अनेक भागांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला.
दरम्यान, ढंढाणे (ता.नंदुरबार) येथे आज सायंकाळी ४.३० च्या सुमारास वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. यादरम्यान, शेरसिंग चंदू भिल (२४) ह शेतातून मजूरी करुन घरी परत जात असतांना त्याच्या अंगावर वीज पडल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, त्याला मृत घोषित करण्यात आले.