ज्याच्या सावलीत खेळत होती बालके तेच झाड बनले यमदुत

बोलेरो वाहनाचेही नुकसान, तळोदा येथील घटना
ज्याच्या सावलीत खेळत होती बालके तेच झाड बनले यमदुत

तळोदा Taloda । श.प्र.-

दुपारच्या वेळी खेळत असताना अंगावर झाड कोसळून (tree fell on him) बारा वर्षीय बालकाचा (child) दुर्दैवी मृत्यू (unfortunate death) झाल्याची घटना शहरातील एकलव्य पुतळ्याजवळ घडली. नयन अविनाश माळी (Nayan Avinash Mali) असे मयत बालकाचे नाव आहे. नयन हा एकुलता एक मुलगा असल्याने त्याच्या अशाप्रकारे अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा शहरातून नंदुरबारकडे जाणार्‍या बायपास रस्त्यालगत असणार्‍या एकलव्य पुतळा (Eklavya statue) परिसरात दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास मुले खेळत होती. ती मुले ज्या झाडाखाली (tree) खेळत (playing) होती ते झाड अचानक कोसळले. या अपघातात झाडाखाली खेळत असणार्‍या बालकांपैकी नयन अविनाश हिवरे (Nayan Avinash Mali) (वय 12 वर्ष) हा बालक दाबला गेला व त्याचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू (unfortunate death) झाला. कोर असलेल्या झाडाखाली नयन दाबला गेला असल्याचे लक्षात येताच आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ त्याला झाडाखालून बाहेर काढले. त्यानंतर त्याला दवाखान्यात (hospital) उपचारासाठी आणले परंतु सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते.

या अपघातात झाडाखाली महिंद्रा बोलेरो (Mahindra Bolero) (क्र.एमएच19 एपी 2275) ही झाडाखाली दाबली जाऊन तीचेदेखिल मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मयत नयन अविनाश हिवरे हा बालक व त्याचे कुटुंबीय तळोदा शहरातील मगरे चौक परीसरात राहतात.

मयत नयन हा सहावीच्या वर्गात शिकत असून तो मामांकडे नेहमी प्रमाणे खेळण्यासाठी आला असतांना काळाने त्याच्यावर घाला घातला. याप्रकरणी तळोदा पोलिस (police) ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सुधीर गायकवाड करत आहेत.

Related Stories

No stories found.