अरे व्वा.. शहादा आगाराने एकाच दिवसात कमावले इतके लाख...

अरे व्वा.. शहादा आगाराने एकाच दिवसात कमावले इतके लाख...

शहादा Shahada। ता.प्र.

शहादा आगाराने (st depot) दि.23 मे रोजी एकाच दिवसात (single day) सर्वाधिक 13 लाख (lakhs) रुपये उत्पन्न मिळवून विभागात प्रथम (First in the section) क्रमांक मिळवला.

प्रति किलोमीटर आगाराचे उत्पन्न 38 रुपये असून 35 हजार 702 किलोमीटर बस धावली. विभागात भारमान 60 टक्केपेक्षा जास्त आहे. विभागात जास्तीत जास्त उत्पन्न मिळाल्यामुळे शहादा आगार व्यवस्थापक (Shahada Depot Manager) योगेश लिंगायत, स्थानक प्रमुख संजय कुलकर्णी आणि आगारातील अधिकार्‍यांनी शहादा बस आगारातील वाहक, चालक, यांत्रिक विभागातील कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी, यांना पेढे भरवून आनंद उत्सव साजरा केला.

शहादा आगारातील सर्व कर्मचार्‍यांनी आणि अधिकार्‍यांनी, प्रवाशी संघटनाचे पदाधिकारी यांनी प्रवाशांना बसने प्रवास (Travel by bus) करण्याचे आवाहन केले. लांब पल्ल्याच्या गाड्या, प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवासी यांच्या मागणीप्रमाणे सुरू केल्यामुळे उत्पन्न वाढीस हातभार लागला.

आगारातील सर्व कर्मचार्‍यांनी आपले योगदान दिल्यामुळेच शहादा बस आगाराने हे उत्पन्न मिळवले असे योगेश लिंगायत आणि संजय कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक एस.एम.शेख, वाहतूक निरीक्षक ऋषिकेश पावरा, सहाय्यक वाहतूक निरीक्षक मिर्झा, आगार लेखाकार सुरेश पाटील, विलास पाटील, सप्रे, सतीश चव्हाण, शरीफ पिंजारी आदी उपस्थित होते. याप्रसंगी महामंडळ प्रणित प्रवासी संघटनेचे अध्यक्ष प्रा. दत्ता वाघ, सचिव प्रा.रवींद्र पंड्या आगारातील सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले.

विभागात प्रथम येण्याचे सर्व श्रेय वाहक, चालक आणि आगारातील सर्व विभागातील कर्मचार्‍यांचे आहे. त्यांनी परिश्रम घेतल्यामुळे विभागात जास्तीत जास्त उत्पन्न आम्हाला मिळाले, असे आगारप्रमुख योगेश लिंगायत यांनी सांगितले.

शहादा आगारातील वाहक आणि चालक (Carrier and driver) यांत्रिकी विभागातील सर्व कर्मचारी प्रशासन अधिकारी वर्ग, आगारप्रमुख, बसस्थानक प्रमुख, निरीक्षक यांचे टीमवर्क चांगले असल्याने विभागात जास्तीत जास्त उत्पन्न मिळवले याचे श्रेय सर्वांनाच जाते, असे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. ज्ञानी कुलकर्णी यांनी सांगितले.

शहादा आगार प्रमुख, स्थानकप्रमुख, प्रशासकीय वर्ग, सर्व वाहक, चालक यांनी घेतलेले कठोर परिश्रम, यांत्रिकी विभागाने बसेस सुस्थितीत ठेवल्याने पूर्ण क्षमतेने सर्वांनी सहाय्य केले. त्यामुळे सर्व कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत, असे प्रवासी संघटनेचे सचिव प्रा. रवींद्र पंड्या यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com