नवापूर येथे साडे तीन लाखांचे अवैध लाकूड जप्त

वनविभागाच्या गस्ती पथकाची कारवाई
नवापूर येथे साडे तीन लाखांचे अवैध लाकूड जप्त

नवापूर | श.प्र. Navapur

लाकडाची (Wood) अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाला वनविभागाने (Forest Department) ताब्यात घेतले असून सदर वाहनातून सुमारे साडे तीन लाखांचे अवैध लाकूड जप्त केले आहे. येथील (Rural Hospital) ग्रामीण रुग्णालयासमोरील महामार्गावर वनविभागाने ही कारवाई केली.

सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्य. नंदुरबार यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून नवापूर वनक्षेत्रपाल व रेंज स्टाफ गस्त घालत असताना संशयित वाहन (क्र. एम.एच. १९ झेड 3185) ला नवापूर येथील ग्रामीण रुग्णालयासमोरील महामार्गावर अटकाव केला असता वाहन चालक वाहन सोडून पसार झाला. या वाहनाची तपासणी केली असता त्यात इंजायली वृक्षाची तोड करून कटींग केलेला पंचरास जळाऊ माल आढळून आला. सदर वाहन लाकुड मालासह जप्त करून विक्री आगार नवापूर येथे जमा करण्यात आला. जप्त केलेल्या मालाची बाजारभावानुसार अंदाजित किंमत 3 ते साडे तीन लाख रुपये एवढी आहे. सदर कारवाई सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार, वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल, वनपाल सुनीता पाटील, वनरक्षक कमलेश वसावे, अनील वळवी, अमोल गावीत, संतोष गायकवाड, विकास शिंदे, गिरीश वळवी, उदयसिंग पाडवी, वाहन चालक दिलीप गुरव यांच्या पथकाने केली.

दरम्यान, वन्यजीव तसेच अवैध वाहतूक लाकूड संबधित कुठलाही गैरप्रकार निदर्शनास आल्यास तात्काळ टोल फ्री नंबर 1926 वर संपर्क करावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com