
नंदुरबार | प्रतिनिधी Nandurbar
रक्षाबंधन या पवित्र सणाच्या निमित्ताने खा.डॉ.हिना गावीत (MP Dr. Hina Gavit) व डॉ.सुप्रिया गावीत (Dr. Supriya Gavit)यांनी कोरोना योध्द्यांचे (Corona Warrior) औक्षण करून व राखी बांधून भाऊ बहिणीचा पवित्र मानला जाणारा रक्षाबंधन सण साजरा केला.
गेल्या दिड वर्षापासुन कोरोना काळात सतत झटनार्या कोरोना योध्द्यांची रक्षण व्हावे. तसेच त्यांनी कोरोना काळात जिल्ह्यातील नागरीकांचे रक्षण केले. भविष्यात त्यांना अधिक उर्जा मिळावी व त्यांचे रक्षण व्हावे या उद्देशाने खा.डॉ.हिना गावीत व डॉ.सुप्रिया गावीत यांनी कोरोना योध्द्यांसोबत भावनिक रक्षाबंधन साजरा केला.
नंदुरबार जिल्हा रूग्णालयातील (District Surgeon) जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, डॉ.सातपुते, डॉ.राजेश वसावे, यांच्या सह विविध डॉक्टर व कर्मचारी यांचे औक्षण करून व राखी बांधून गावीत बघीनींनी भाऊ बहिणीचा पवित्र मानला जाणारा रक्षाबंधन सण साजरा केला.
तसेच आरोग्य विभागासोबतच दिवस रात्र खंभीरपणे उभा राहणार्या कोरोना योध्दे म्हणजे पोलीस विभाग नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अर्जुन पटले तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे ओक्षण करून खा.डॉ.हिना गावीत व डॉ.सुप्रिया गावीत यांनी राखी बांधली यावेळी त्यांच्या समवेत सविता जायस्वाल, पिनल शहा आदी उपस्थीत होते.