आटावापाडा व बारीपाडा येथील महिलांची पाण्यासाठी दर्‍याखोर्‍यातून भटकंती

धनखेडी गावात जाण्यासाठी रस्ताच नसल्याने सुविधांचा अभाव, उपाययोजनांची गरज
आटावापाडा व बारीपाडा येथील महिलांची पाण्यासाठी दर्‍याखोर्‍यातून भटकंती

मोलगी | वार्ताहर - MOLAGI

अक्कलकुवा तालुक्यातील नर्मदा (Narmada) किनार्‍यावरील धनखेडी गावात (Dhankhedi village) जाण्यासाठी रस्ताच (road) नाही. रस्त्याअभावी हातपंप (Hand pump) टाकता येत नाही व कोणत्याच प्रकारे पाण्याची सोय (Water supply) करता येत नसल्याने आटावापाडा (Atawapada) व बारीपाडा (Baripada) या पाडयांवरील ग्रामस्थांना डोंगर दर्‍याच्या चढउतार मार्गाने भटकंती करीत नर्मदा नदीतून (Narmada river) पाणी (Water) आणावे लागत आहे.

सातपुड्याच्या अतिदुर्गम नर्मदा किनार्‍याचा भाग म्हणून ओळख असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील धनखेडी (Dhankhedi village) येथे जाण्यासाठी रस्ता (no road) नसल्याने रस्त्याअभावी वाहने (Vehicles) जाऊ शकत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा हातपंप (Hand pump) टाकण्यासाठी गाडी जात नसल्याने हातपंप टाकता आलेले नाही किंवा पाण्याची सोयही करता आलेली नाही.

त्यामुळे धनखेडी गावाचे आटावापाडा, बारीपाडा येथे हातपंप (Hand pump) नसल्याने किवा पाण्याची सोय नसल्याने या पाड्यांवरील नागरीकांना पाण्यासाठी डोंगर माथ्याच्या चढउतारच्या पायवाटेने भटकंती करीत नर्मदा नदीतून (Narmada river) पिण्यासाठी पाणी आणावे लागत असते.

सिगालापाडा येथे विहीर असल्याने तेथून सिगालापाडयावरील नागरीक पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग करीत असतात. याबाबत लोकप्रतिनिधी, अधिकारी व पदाधिकार्‍यांनी दखल घेवून या पाडयांवर सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com