गावठी कट्टा बाळगणार्‍या महिलेस अटक

शहादा येथील पोलीस लाईनसमोरील दुकानातील घटना
गावठी कट्टा बाळगणार्‍या महिलेस अटक

नंदुरबार | प्रतिनिधी - nandurbar

शहादा येथे (police) पोलीस लाईनसमोरील दुकानात गावठी बनावटीचे लोखंडी धातुचा कट्टा विक्री करण्याचे उददेशाने कब्जात बाळगतांना मिळुन आल्याने महिलेस अटक करण्यात आली आहे.

शहादा शहरातील पोलीस लाईनसमोरील चष्मा विक्रीच्या दुकानात ७ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान सुरेखा उर्फे सांची गणेश गुजराथी हिने ६ हजार रूपये किंमतीचा गावठी बनावटीचा १ लोखंडी कटटा विक्री करण्याचे उददेशाने कब्जात बाळगतांना मिळुन आली .

पोलीसांनी कट्टा जप्त केला असुन, पोना.मनिलाल दिलीप पाडवी यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात सुरेखा उर्फे सांची गणेश गुजराथी रा.नितीन नगर , शहादा हिच्या विरूध्द भारतीय हत्यार का.क ३.७ चे उल्लंघन २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई माया राजपूत करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com