रजाळ्यात मेंढ्यांच्या कळपावर लांडग्यांचा हल्ला

११ मेंढ्या ठार
रजाळ्यात मेंढ्यांच्या कळपावर लांडग्यांचा हल्ला

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

तालुक्यातील रजाळे (Razale) येथे शेत शिवारात मध्यरात्री मेंढ्यांच्या कळपावर ४ ते ५ लांडग्यांच्या टोळीने हल्ला करून तब्बल ११ मेंढ्यांचा फडशा पाडला. या हल्ल्यात मेंढपाळाचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाले आहे. या घटनेचा वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे.

तालुक्यातील रजाळे (Razale) येथील डेमा ठेलारी यांच्या मेंढ्यांचा कळप (flock of sheep) आपल्या शेतातच असल्याने रात्री १ वाजेच्या सुमारास अचानक ४ ते ५ लांडग्यांनी (Wolves) मेंढ्यांवर हल्ला चढवला. यात दहा मेंढ्या (sheep) व एक कोकरू अशी ११ जनावरे फस्त केली आहेत.

रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने धनगर कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने लांडग्याच्या हल्ल्यात धनगर कुटूंबिय बचावले आहे. त्यांच्या मेंढ्यांच्या कळपामध्ये १५० ते २०० मेंढ्या होत्या.

यात ११ मेंढ्या लांडग्यांनी (Wolves) ठार केल्या आहेत. यामुळे डेमो ठेलार्‍यांचे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा वन विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे.

यावेळी वनविभागाचे कर्मचारी तांबोळी व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.नाना पाटील, सावळीराम करिया, सीधा बडगर, डेमा ठेलारी आदी उपस्थित होते. सदर घटनेमुळे परिसरात शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com