बालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात युवकासह महिलेचा नदीत बुडून मृत्यू

बालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात युवकासह
 महिलेचा नदीत बुडून मृत्यू
बाभुळगाव गंगा

शहादा,Shahada| ता.प्र.

आमलाबारी (Amlabari) (ता.अक्कलकुवा) या गावालगत नदीवर स्नान (Bathing in the river) करण्यासाठी गेलेल्या बालकाचा जीव (child's life) वाचवण्याचा प्रयत्न (Trying to save)करीत असताना एका युवकासह (Youth) त्याच्या मावशीच्या पाण्यात बुडून मृत्यू (Aunt drowned) झाल्याची घटना घडली. आज दि. 6 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. फैजान शेख सज्जाद (वय २१) व त्याची मावशी नौरून्नीसा अशपाक तेली (वय ३५) या दोघांचा पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्यू झाला.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहादा शहरातील गांधीनगर भागात राहणारे सज्जात शेख हे अक्कलकुवा येथे एका संस्थेत शिपाई पदावर काम करतात. सध्या सुट्टी असल्याने ते शहादा येथे आले होते. मयत फैजान शेख सज्जात हा विद्यार्थी बी फार्मसीच्या शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत होता. आज सकाळी आपली मावशी नौरून्नीसा अश्पाक तेली व तिचे दोन मुले असा सर्व परिवार अक्कलकुवा तालुक्यातील आमलाबारी येथे फिरण्यास गेले होते.

दुपारी आंघोळ करीत असताना त्यांच्यासोबत असलेला एक बालक पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच फैजान शेख हा त्याला वाचवण्यासाठी गेला. त्यावेळी त्याची मावशी नौरूणन्नीसा तेली याही त्याला सहकार्य करण्यासाठी गेल्या असता बालक वाचला. परंतु यात फैजान शेख व नौरूण्णीसा तेली या दोघाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच शहादा शहरात तेली समाज गांधीनगर भागात शोकाकुल वातावरण झाले. शहादा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष शेख जहीर शेख बशीर यांनी याबाबत अक्कलकुवा पोलीसांशी संपर्क साधून तातडीने मदतीचे पोलीस प्रशासनाला विनंती केल्यामुळे दोघा मयतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com