आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी पालकत्व स्विकारणार

तळोदा येथे जनआशीर्वाद यात्रेप्रसंगी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांचे प्रतिपादन
आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी पालकत्व स्विकारणार

मोदलपाडा Modalpada /सोमावल । वार्ताहर-

जिल्ह्यात आरोग्याचे Health अनेक प्रश्न आहेत. हे प्रश्न सोडविण्यासाठी मी नंदुरबार जिल्ह्याचे Nandurbar district पालकत्व Guardianship स्वीकारणार आहे. तातडीने आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन केंद्रीय आरोग्य, महिला व बालकल्याण मंत्री डॉ.भारती पवार Union Health, Women and Child Welfare Minister Dr. Bharti Pawar यांनी तळोदा Taloda येथे महिला मेळाव्याप्रसंगी Women's meet दिलेत.

जन आशीर्वाद यात्रेनिमित्त त्या तळोदा येथे आल्या होत्या. त्यांच्या उपस्थितीत आदिवासी सांस्कृतिक भवनात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर भाजपा खा.डॉ.हिना गावित, आ.राजेश पाडवी, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, राजेंद्रकुमार गावित, पं.स. सभापती यशवंत ठाकरे, किशोर काळकर, विधानसभा प्रभारी क्षेत्रप्रमुख नारायण ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी, ओबीसी मोर्चाचे प्रदीप शेंडे, तुषार काळकर, प्रकाश गेडाम, तालुका अध्यक्ष बळीराम पाडवी, जिल्हा सरचिटणीस राजेश गावित आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री भारती पवार म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी नेतृत्वाखालील सरकारने आरोग्यासाठी आयुष्यमान भारत, माता जननी सुरक्षा अश्या अनेक योजना आणल्या आहेत. परंतू त्याची प्रभावी अंमलबजावणी होतांना दिसत नाही. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तरीही हे प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने आपल्या आरोग्य मंत्रालयामार्फत ठोस पाऊले उचलणार असल्याचे त्यांनी या कार्यक्रमात सांगितले. यावेळी खा.डॉ.हिना गावित यांनी आदिवासी भाषेत मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे ऑक्सिजन प्लांट मंजूर करण्यात आला आहे. केंद्राच्या मंत्र्यांनी त्यातील अडचणी दूर करून तो लवकरात लवकर बसविण्यात यावा. आदिवासी गरीब महिलांसाठी आरोग्य सेवा देण्यात यावी.

आ.राजेश पाडवी म्हणाले की, मोदी सरकारने फक्त महाराष्ट्राच्या महिलांच्या सन्मानाबरोबरच आदिवासी महिलांचाही सन्मान केला आहे. आदिवासी भागामध्ये आरोग्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. केंद्राकडून विविध आरोग्य सेवा सुविधेविषयी काही योजना असतील, त्या योजना आदिवासी महिलांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले. भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, सानू वळवी यांनीही मनोगत व्यक्त केले.

जनआशीर्वाद यात्रा यशस्वी करण्यासाठी भाजपा तालुकाध्यक्ष बळीराम पाडवी, हेमलाल मगरे, प्रदीप शेंडे, दारासिंग वसावे, संजय कर्णकार, ईश्वर पोटे व योगेश चव्हाण यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कौशल पाटील यांनी केले.महिला मेळाव्याचे आयोजन आदिवासी सांस्कृतिक भवनात करण्यात आले होते. अनेक गावांचे नृत्यपथक आपल्या पारंपरिक वेशभूषेत नृत्य करीत होते. मंत्र्यांनी त्याच्या गाण्यांवर ताल धरला. त्यामुळे आदिवासी नृत्य पथकांमध्ये उत्साह संचारलेला पहावयास मिळाला. याशिवाय महिला मेळाव्यात त्यांनी आदिवासी महिलांमध्ये जावून बसल्यात व त्यांनी सेल्फीसुद्धा काढली. प्रथमच केंद्रीय मंत्रीला आपल्यात बसल्याचे पाहून आदिवासी महिला भारावून गेल्या होत्या.

शहरातील नंदुरबार प्रवेशद्वारापासून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. तळोदा शहरात प्रवेश करतांना केंद्रीय आरोग्य मंत्रांचे शहरवासियांनी त्यांचे स्वागत जागोजागी करण्यात आले. त्यांनी बाजारपेठेत रस्त्यावर बसून भाजीपाला विकणार्‍या आदिवासी महिलांकडे जावून भाजीपाला विकत घेतला. त्यामुळे त्यांच्या साधेपणाबाबत शहरात चर्चा सुरू होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com