अन् भरदुपारी नदीपात्रातून धावत तहसीलदार ट्रॅक्टर पकडतात तेव्हा...

अन् भरदुपारी नदीपात्रातून धावत तहसीलदार ट्रॅक्टर पकडतात तेव्हा...

नरेंद्र बागले

शहादा ।Sahada

डोक्याला रुमाल बांधून तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी (Tehsildar Dr. Milind Kulkarni) यांनी रणरणत्या उन्हात भर दुपारी गोमाई नदीपात्रातून (Gomai river basin) अवैधरित्या गौण खनिज (Illegal secondary minerals) वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरचा पाठलाग करीत पकडले (Caught). ट्रॅक्टर (tractor) आणि तहसीलदारांच्या शर्यतीत अखेर तहसीलदार जिंकले डॉ. कुलकर्णी यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

आज दुपारी तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी खेडदिगर येथून कार्यक्रम आटोपून तहसील कार्यालयात येत असताना सुसरी धरणाजवळील गोमाई नदी पुलाखाली (Gomai river basin) नदी पात्रात एक ट्रॅक्टर अवैधरित्या गौण खनिज (Illegal secondary minerals) भरताना दिसले. सदर ट्रॅक्टर पकडायचे असेल तर शासकीय वाहनाने नदीपात्रात गेल्यास चालक ट्रॅक्टर घेऊन पळून जाईल, या शक्यतेने तहसिलदारांनी त्यांचे शासकीय वाहन बाजूला उभे करून जैन लेण्यांच्या बाजूने नदी पात्रात उतरले.

मात्र ट्रॅक्टरच्या आजूबाजूला 5 ते 6 लोक असल्याने त्यांना संशय येऊ नये म्हणून डॉ.कुलकर्णी यांनी डोक्याला रुमाल बांधून चेहर्‍यावरचे हावभाव बदल करीत व साधारण व्यक्ती असल्याचे भासवले. ट्रॅक्टरजवळ (tractor) जाऊ लागले. ही वेळ दुपारची रणरणत्या उन्हाची होती. त्यांच्यासोबत अव्वल कारकून प्रदीप पाटीलही होते.

दरम्यान, तहसीलदारांनी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांच्याशी संपर्क साधल्याने त्यांनीही सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे यांना पथकासह पाठविले. पोलीस पथक येईपर्यंत गौण खनिज भरणार्‍या लोकांना संशय आल्याने त्यांनी घाईघाईने ट्रॅक्टर सुरू करून पळविण्याचा प्रयत्न केला. तहसीलदार डॉ.कुलकर्णी यांनीही ट्रॅक्टरचा (tractor) पाठलाग सुरू केला. ट्रॅक्टर पुढे तर तहसीलदार त्यांच्यामागे धावत होते. अखेर त्या रणरणत्या उन्हात नदी पात्रातल्या खडकाळ भाग आणि सखल उंच व त्यातून तहसीलदारांनी या शर्यतीत बाजी मारत ट्रॅक्टर पकडले. (catches) तोपर्यंत पोलीस (Police) पथकही पोहोचले होते. पोलीस पथकाच्या मदतीने सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

Related Stories

No stories found.