सेवानिवृत्त पोलीस अंमलदारांसोबत पोलीस अधीक्षक दिवाळी साजरी करतात तेव्हा...

सेवानिवृत्त पोलीस अंमलदारांसोबत पोलीस अधीक्षक दिवाळी साजरी करतात तेव्हा...

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

सेवानिवृत्ती (Retirement) हा असा प्रसंग असतो की, सेवानिवृत्त होणार्‍यांसाठी काहीसा आनंदी तर काही दुःखी, अशा दोन्ही क्षणांचा विचार त्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर असतात. यशस्वीरीत्या पोलीस दलाची (Police force)सेवा (service) केल्यानंतर दुसर्‍या दिवसापासुन गणवेश परिधान करता येणार नाही किंवा रोजच्या दिनचर्येप्रमाणे काम करता येणार नाही या विचाराने सेवानिवृत्त होणार्‍यांचे मन दु:खी होते, परंतु दुसर्‍याच क्षणात हाही विचार येतो की, येणारा उद्याचा दिवस आपल्यासाठी एक नविन प्रवास (New journey)सुरु करणारा असेल व नविन आयुष्यात प्रवेश करणारा असेल या विचाराने आनंद ही होत असतो.

पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्याचा जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासुन नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सेवानिवृत्त झालेले सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या वेळोवेळी अडचणी ऐकुन त्या वेळेत सोडवल्यादेखील आहेत. सेवानिवृत्त झालेल्या अंमलदारांना कधीही असे वाटु नये की, आपण पोलीस दलात कार्यरत असतांना अनेक सामान्य व्यक्तींच्या अडचणी, प्रश्न, तक्रार सोडविल्या, परंतु सेवानिवृत्तीनंतर आपल्याच अडचणी कोणी सोडवणार नाही किंवा आपल्याला कोणी विचारणार नाही, म्हणून पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातुन सेवानिवृत्त झालेले सर्व पोलीस अधिकारी व अमंलदार यांचे सोबत यंदा दिवाळी साजरी करण्याचे ठरविले.

त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातुन यशस्वीरीत्या सेवानिवृत्त झालेले सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना दि.4 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार येथे बोलावून त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देवुन त्यांच्या सोबत फराळ केला.

पोलीस दलातून यशस्वीरीत्या सेवा केल्यानंतर त्यांचा आदर करणे हे आपले कर्तव्य असुन सेवानिवृत्त पोलीस अंमलदारांचे जे काही प्रश्न, अडचणी असतील त्या लवकरात लवकर सोडविल्या जातील असे यावेळी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले. नंदुरबार जिल्हा निर्मितीनंतर तसेच सेवानिवृत्तीनंतर पहिल्यांदाच पोलीस अधीक्षकांनी त्यांच्यासोबत फराळाला बोलविले यापुर्वी आम्हाला कधीही असे कोणी बोलावुन आमच्या अडी अडचणींची विचारपुस केली नाही, म्हणून सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे संघटनेच्या वतीने आभार व्यक्त केले.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस उप-अधीक्षक विश्वास वळवी, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com