
मोलगी Molgi । वार्ताहर -
सातपुड्यातील होळी या नृत्यपथकाला (Holi dance troupe) अनेक कार्यक्रमांमध्ये नृत्य सादरीकरणासाठी आमंत्रित केले जाते. परंतु हे नृत्य कुठल्याही वेळेस व पाहिजे त्या ठिकाणी सादर (Regards) करता येत नाही. एवढेच नव्हे तर त्याचा साधा सोंगही करता येत नसल्याचे म्हणत आदिम संस्कृती संवर्धनासाठी (Cultivation of primitive culture) आदिवासींमधील (Tribals) आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे काळाची गरज आहे, यासह विविध ठराव काठी (ता.अक्कलकुवा) येथे झालेल्या 23 राज्याच्या महापंचायतीत (Kathi Mahapanchayat) करण्यात आले.
आगामी होळीच्या पार्श्वभूमीवर आदिवासी एकता परिषद(Tribal Ekta Parishad) व अन्य संस्था-संघटनांतर्फे ही काठी ता.अक्कलकुवा येथे महापंचायतीचे (Mahapanchayat) आयोजन करण्यात आले होते. या महापंचायतीत काठी संस्थानचे वारस पृथ्वीसिंग पाडवी, एकता परिषदेचे सी.के.पाडवी, डॉ.दिलवरसिंग वसावे, अॅड.अभिजीत वसावे, अॅड. सरदारसिंग वसावे, नागेश पाडवी, जेलसिंग पावरा, वालसिंग राठवा, क्रांती राठवा, सानिया राठवा, कॉ.बाज्या वळवी, केराम जमरा, सरपंच सागर पाडवी, करमसिंग पाडवी, वसावे मोतिराम गुरुजी, प्रेमचंद सोनवणे, डॉ.सायसिंग वसावे, बहादुरसिंग पाडवी, राजेंद्रसिंग पाडवी, गणपत पाडवी, अॅड.किरेसिंग पाडवी, ब्रिजलाल पाडवी, दिनू गावीत आदी उपस्थित होते.
अन्यत्र होळी नृत्य सादरीकरणावर बंदीचा निर्णय
प्रेक्षकांना सहज आकर्षित करणारे सातपुड्यातील होळी नृत्य (Holi dance) पथकांना पाहुण्यांचे स्वागत, लग्नातील वेगळेपणा, गणपती विसर्जन व अन्य कार्यक्रमांची शोभा वाढविण्यासाठी आमंत्रण देत नृत्याचे सादरीकरण होते. परंतु ही बाब आदिवासी संस्कृती (Tribal culture) संवर्धनातील मोठा अडथळा असल्याचे मत या पंचायतीत मांडण्यात आले.
खरं तर हे नृत्य केवळ होळीच्या कालावधीतच सादर करता येते, होळीचा व्रतधारी व्यक्तीच हे नृत्य सादर करु शकतो. या व्रताचे महिनाभर काटेकोर पालन करावे लागते, परंतु आज यात स्वार्थ निर्माण झाले असून या स्वार्थापोटी (Selfishness) हे नृत्य पटेल तसे अन् वाटेल तेथे सादर होऊ लागले, यावर नियंत्रण आणण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला. यासह या पंचायतीत घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी आगामी होळीपासूनच करण्याचा निर्णयही घेण्यात आला. आदिवासी संहितेबाबत (Tribal codes) मान्यवरांचे मतविधीवत पूजेसाठी आदिवासींमध्ये दुग्धाभिषेक करण्याची प्रथा आहे.
ही पवित्र स्नान (Holy bath) झाल्यानंतर ती व्यक्ती नियोजित कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत खाटावर बसत नाही, कपडे-बिस्तर अलिप्तच ठेवतो, दगड फेकून मारत नाही. मोठ्या कालावधीचे व्रत (पालनी) पाळतांना प्रामुख्याने पुरुषांनाच ही भूमिका निभावावी लागते, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. आज राजे नसले तरी राजा व प्रजा यांच्यातील पुर्वीसारखे संबंध आजही कायम आहे. त्या राजांनी सुरु केलेल्या परंपरेतील होलीकोत्सव आजही सातपुड्यातील आदिवासी बांधवांच्या साक्षीने, उपस्थितीत साजरी करण्यात येत आहे.
महापंचायतीत करण्यात आलेले विविध ठराव
* होळी नृत्यातील बांबू टोप, दुधी, पिंपळवर्गीय फळांच्या माळा या साहित्यांच्या विधीवत त्यागानंतर गैरवापर टाळावा. *व्रतधारी (पालनी पाळणारा) शिवाय अन्य व्यक्तीने होळी नृत्य सादर करणे व साहित्यांचा स्पर्श टाळावे. * याहा मोगी मातेच्या दर्शनासाठी जातांना महिलेने आदिवासी पेहरावच परिधान करावा. *मेलादा, यात्रा व होळीत कर्णकर्कश आवाजाच्या खेळण्या व वाद्य विक्रीवर बंदी. * होळीत शिबली नृत्य टाळावे. *गाव पुंजारांमार्फतच लग्नविधी करावी. *बनावट दारुचे पुजाविधी टाळावी. * 1 वय वर्षाआधी मुला-मलीचे लग्न लावू नये.* दहेज परतीचा वाद न्यायालयात घेऊन जाऊ नये. होळी नृत्यासाठी वापरले जाणारे वाद्य व साहित्यांंना मोरखीशिवाय अन्य व्यक्तींनी स्पर्श टाळावा, केल्यास सामाजिक विरोध करण्याचा ठरावही यावेळी पारित करण्यात आला.