अक्कलकुवा येथे कल्याणक महोत्सव

अक्कलकुवा येथे कल्याणक महोत्सव

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

जैन समाजाचे (Jain society) 24 वे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी (Tirthankar Lord Mahavira Swami) यांचा जन्म कल्याणक महोत्सव (Birth Welfare Festival) उत्साहात साजरी (Celebration) करण्यात आली. या निमीत्ताने श्री सकल जैन समाज अक्कलकुवा च्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

श्री वासुपूज्यस्वामी स्वामी जिनमंदिर येथून शोभायात्रा (Shobha Yatra) काढण्यात आली. भगवान महावीर स्वामींच्या प्रतिमेची आकर्षक सजावट असलेल्या सुशोभित पालकी ढोल, ताशा सह वाजत-गाजत शोभायात्रा काढण्यात आली. अहिंसा परमो धर्म, वंदे विरम, भगवान महावीर स्वामी की जय अशा घोषणांनी (announcements) परिसर दणाणून गेला.

शोभायात्रेची सांगता जैन मंदिर परिसरात करण्यात आली. यावेळी स्वामीवात्सल्यचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी एक सामयिक प्रभु वीर के नाम कार्यक्रम संपन्न झाला. संध्याकाळी प्रत्येक घराबाहेर दिवे लाउन रोषणाई (Lighting) करण्यात आली. रात्री प्रभु भक्तिचे आयोजन करण्यात आले होते.

Related Stories

No stories found.