सामुहिक सूर्यनमस्काराने नववर्षाचे स्वागत

नंदुरबार, श्रॉफ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम
सामुहिक सूर्यनमस्काराने नववर्षाचे स्वागत

नंदूरबार - प्रतिनिधी nandurbar

नंदूरबार शहरातील श्रॉफ हायस्कूल (Shroff High School) व कनिष्ठ महाविद्यालयात नववर्षाचे स्वागत (Happy New Year) करीत ३५० विद्यार्थ्यांनी सामुहिक सूर्यनमस्कार करीत १ जानेवारी २०२२ च्या उगवत्या भास्कराला नमन केले.

दरवषी श्रॉफ हायस्कूलतर्फे हा उपक्रम केला जातो. सार्वजनिक शिक्षण समिती नंदुरबार संचलित, श्रीमती हिरीबेन गोविंददास श्रॉफ हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार यांच्यातर्फे नवे वर्ष नवी आशा नवी आकांक्षा या उमेदीनेच दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील शाळेतील विद्यार्थीसाठी सर्वांग व्यायाम प्रकार म्हणजेच सामुहिक सूर्य नमस्काराने १ जानेवारी २०२२ च्या उगवत्या भास्कराला नमन करीत सामुहिक सूर्यनमस्कार घालण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा उपसंचालक, नाशिक विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी, नंदुरबार सुनंदा पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र बी. कळमकर, मुख्याध्यापिका सुषमा मनिष शाह आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com