
म्हसावद Mhsavad ता.शहादा । । वार्ताहर
शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सुलतानपूर (Government Secondary Ashram School Sultanpur) ता.शहादा येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या (Member of Maharashtra State Commission for Women) दीपिका चव्हाण, उत्कर्षा रूपवते यांनी गुरूवारी भेट दिली. भेटी दरम्यान त्यांनी मुलींशी चर्चा (Talk to girls) करून त्यांच्या अडचणी,समस्या जाणून घेतल्या. मुलींचे वसतीगृह,स्वच्छता,आरोग्य,जेवण व इतर शालेय बाबी याविषयी माहिती जाणून घेतली.त्यांनी प्रत्यक्ष जेवणाची चव तपासून पाहीली.
रुपवते यांनी मुलींशी बोलताना सांगितले की,भविष्यात आपण अभ्यास करून खूप मोठया पदावर विराजमान व्हावे.सोबतच त्यांनी भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचेही उदाहरण दिले.पोलीस निरीक्षक देवरे यांनी मुलींना आपले चारित्र्य आणि आरोग्य याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.सदस्यांनी अधिक्षिका यांच्याशी सुद्धा संवाद साधला आणि मुलींचे कौतुक केले.
यावेळी जि प नंदुरबार येथील महिला बालविकास अधिकारी गिरीश जाधव,प्रकल्प कार्यालय नंदुरबार येथील सहायक प्रकल्प अधिकारी एस एन काकडे, शैलेश पटेल, किरण मोरे,विस्ताराधिकारी एस आर पाटील, आर जे मुसळे,म्हसावद पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र मोरे,जितेंद्र पाडवी, शैलेंद्र राजपूत हे उपस्थित होते.
तसेच ग्रामपंचायत सुलतानपूर येथील सरपंच आशाबाई मोहन आवासे,ग्रामसेवक,तलाठी यांच्यासह शासकीय आश्रमशाळा सुलतानपूर येथील मुख्याध्यापक एन के दुसाने,अधीक्षक निलेश पाटील,अधीक्षिका एस डी फोलाने व सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते.एकंदरीत भेटीच्या दरम्यान राज्य महिला आयोगाच्या सदस्या यांनी शाळेविषयी समाधान व्यक्त केले.