हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन ; तिघांना अटक

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन ; तिघांना अटक

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी तसेच आगामी सण उत्सव व निवडणूका सुरळीत पार पडाव्यात यासाठी नंदुरबार जिल्ह्यातून २३ जणांना पोलीस अधीक्षकांनी हद्पार केले होते. परंतू तरीही हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करुन जिल्हयात फिरणार्‍या तिघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे.त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणुक-२०२१ व नवरात्रोत्सव काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी करीता महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे यापुर्वी

नंदुरबार जिल्ह्यातून २ वर्ष कालावधीसाठी दोन टोळ्यांमधील १४ आरोपी व १ वर्ष कालावधीसाठी एका टोळीतील ५ आरोपी तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ प्रमाणे ०४ आरोपी असे एकुण २३ आरोपीतांना नंदुरबार जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आले आहेत.

हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीतांना नंदुरबार जिल्हाबाहेर गुजरात राज्यात त्यांचे नातेवाईकांकडे सोडण्यात आले होते. परंतु त्यातील काही सराईत गुन्हेगार हे नंदुरबार जिल्ह्यात पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांची कुठलीही परवानगी न घेता वावरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गुप्त मिळाली होती.

त्या अनुषंगाने त्यांनी एक स्वतंत्र पथक तयार करुन मालाविरुध्द् गुन्हे करणारे हद्दपार आरोपी संतोष दिलीप तिजविज (वय-२८ रा. बाहेरपुरा, नंदुरबार) हा दि.२५ सप्टेंबर २०२१ रोजी, महेंद्र धरम ठाकरे (वय-२६ रा. डामरखेडा ता. शहादा) हा दि.२८ सप्टेंबर २०२१ रोजी, गोरख मोहन ठाकरे (वय-२० रा. डामरखेडा ता. शहादा),

महेंद्र धरम ठाकरे (वय-२६ रा. डामरखेडा ता. शहादा) हा ३० सप्टेंबर २०२१ रोजी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, नंदुरबार यांची अथवा न्यायालयाची कुठलीही पुर्व परवानगी न घेता नंदुरबार जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास मिळून आल्याने त्यांच्याविरुध्द् महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे नंदुरबार शहर व शहादा पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील महेंद्र ठाकरे हा हद्दपारीच्या कारवाईदरम्यान दोन वेळा जिल्हयात आढळून आला.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार दिपक गोरे,

पोलीस नाईक- राकेश मोरे, राकेश वसावे, विकास कापुरे, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे पोलीस अंमलदार विजय ढिवरे, किरण मोरे, अभय राजपूत, आनंदा मराठे, यशोदिप ओगले यांच्या पथकाने केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com